मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) नुकतीच ग्रँड व्हिटारा (Grand Vitara) ही गाडी बाजारात सादर केली आहे. तर त्याआधी काही दिवस न्यू ब्रेझा (New Brezza) ही गाडी लाँच करण्यात आली होती. या दोन्ही गाड्यांचे ऑनलाइन बुकिंग सुरू आहे. ग्राहकांना या दोन्ही SUV गाड्या खूप आवडल्या आहेत. ग्रँड व्हिटारा आणि न्यू ब्रेझा या दोन्ही एसयूव्हींचे (Suv car) आत्तापर्यंत एक लाखांहून अधिक बुकिंग झाले आहे. मारुती सुझुकीने या दोन्ही गाड्यांच्या बळावर भारतीय बाजारात या सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. ग्राहकांनाही या दोनही गाड्या खूप आवडल्या असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
आत्तापर्यंत ग्रँड व्हिटारा गाडीची 26 हजारांपेक्षा जास्त युनिट्स बूक झाली आहेत. तर 75 हजारांपेक्षा अधिक लोकांनी न्यू ब्रेझा ही गाडी बूक केली आहे. दोन्ही गाड्या मिळून मारूती कंपनीला आत्तापर्यंत 1 लाखाहून अधिक युनिट्सची ऑर्डर मिळाली आहे. अजूनही दररोज दोन्ही गाड्यांसाठी जोरदार बुकिंग सुरूच आहे. 21 जून पासून न्यू ब्रेझा या गाडीचे तर 11 जुलै पासून ग्रँड व्हिटारा गाडीचे बुकिंग सुरू झाले होते.
अवघ्या तीन आठवड्यांमध्ये ग्रँड व्हिटारा गाडीच्या बुकिंगचा आकडा 20 हजारांपार पोचला आहे. ही नवी एसयूव्ही 11 हजार रुपयांमध्ये बूक करता येऊ शकते. या गाडीची किंमत अंदाजे 9.5 लाख रुपये ( एक्स- शो रूम) आहे. त्यामध्ये कंपनी व्हेंटिलेटेड सीट, मल्टीपल ड्रायव्हिंग मोड असे फीचर्स देण्यात आले आहेत. ग्रँड व्हिटारा मिड साईज एसयूव्ही (SUV)ही मारुती सुझुकीची अशी पहिली कार आहे, ज्यामध्ये हायब्रिड इंजिन आहे.
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी अधिकापी शशांक श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रँड व्हिटाराच्या मजबूत हायब्रिड इंजिन व्हेरिएंटबद्दल लोकांच्या मनात रस दिसून येत आहे. ग्रँड व्हिटाराच्या बुकिंगपैकी निम्मे प्री-बुकिंग हे हायब्रिड व्हेरिएंट (कारचे) झाले आहे.
मारुती न्यू ब्रेझा या गाडीला लाँचच्या दिवशीच चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी या गाडीची 4500 युनिट्स बूक झाली होती. दिवसेंदिवस या गाडीच्या बुकिंगचा आकडाही वाढत चालला आहे. न्यू ब्रेझाचे बुकिंग 21 जूनला सुरू करण्यात आले होते, तर 30 जूनला ही गाडी बाजारात सादर करण्यात आली. 11 हजार रुपये देऊन ही गाडी बूक करता येते.