‘या’ वाहन कंपनीचा भारतीय मार्केटवरील दबदबा कायम, अवघ्या 28 दिवसात 1.64 लाख गाड्यांची विक्री

| Updated on: Mar 01, 2021 | 4:05 PM

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनीने फेब्रुवारी 2021 मध्ये केलेल्या विक्रीचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत.

या वाहन कंपनीचा भारतीय मार्केटवरील दबदबा कायम, अवघ्या 28 दिवसात 1.64 लाख गाड्यांची विक्री
Follow us on

मुंबई : मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) 2021 च्या फेब्रुवारी महिन्यातील वाहनांच्या विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. या काळात कंपनीची एकूण 1,52,983 वाहनांची देशांतर्गत विक्री केली आहे. 2020 मध्ये याच महिन्यात विक्री झालेल्या 136,849 वाहनांच्या तुलनेत यामध्ये 11.8 टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे, मारुती सुझुकीची फेब्रुवारी 2021 मधील एकूण (देशांतर्गत विक्री आणि परदेशी निर्यात) विक्री 1,64,469 इतकी नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत कंपनीने एकूण 147,110 वाहनांची विक्री केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यात 11.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. (Maruti Suzuki India Sales February 2021 Registers 11.8% Growth In Domestic Market)

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने जानेवारी 2020 मध्ये 1 लाख 54 हजार 123 वाहनांची विक्री केली होती. त्यामध्ये यंदा 4.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मारुतीने यंदा जानेवारी महिन्यात 1 लाघ 60 हजार 752 वाहनांची विक्री केली आहे. मारुतीच्या प्रवासी व्हेईकल्सची विक्री 6.9 टक्क्यांनी घसरून 103,435 वाहनांवर आली आहे. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत 0.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर निर्यातीत 29.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सब कॉम्पॅक्ट कार्सची जोरदार विक्री

मारुतीच्या स्विफ्ट, सेलेरिओ, इग्निस, वॅगनआर आणि बलेनो सारख्या हॅचबॅक कार्स आणि त्यांच्या सबकॉम्पॅक्ट कार तसेच सेडान कार्सची विक्री 80 हजारांच्या पुढे आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत या सेगमेंटमधील 69,828 वाहनांची विक्री करण्यात आली होती. यात यंदा 15.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कंपनीची कॉम्पॅक्ट सेडान, मारुती सुझुकी सियाझच्या विक्रीमध्ये पुन्हा 40,6 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या महिन्यात या कारच्या 1,510 युनिट्सची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी याच महिन्यात सियाझच्या 2,544 युनिट्सची विक्री करण्यात आली होती. दुसऱ्या बाजूला मारुतीच्या अर्टिंगा, विटारा ब्रेझा, एक्सएल 6, एस-क्रॉस आणि जिप्सीच्या विक्रीत फेब्रुवारी 2021 मध्ये 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर इको व्हॅनच्या विक्रीत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील महिन्यात कंपनीच्या प्रवासी वाहनांची विक्री (पीव्ही) 1,44,761 युनिट्स इतकी नोंदवण्यात आली आहे, जी फेब्रुवारी 2020 मध्ये विक्री झालेल्या 1,33,702 वाहनांपेक्षा 8.3 टक्क्यांनी जास्त आहे.


हेही वाचा

भारतीयांच्या मनात भरलेली Nissan Magnite क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?

टाटा मोटर्सची नवीन सफारी लॉन्च, जाणून घ्या गाडीची काय आहेत हटके फिचर्स?

केवळ 2,499 रुपयात घरी न्या होंडाची शानदार बाईक आणि स्कूटर, मिळवा 5000 रुपयांचा कॅशबॅक

(Maruti Suzuki India Sales February 2021 Registers 11.8% Growth In Domestic Market)