Maruti Suzuki Jimny
Image Credit source: Global Suzuki
मुंबई : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ही वाहन निर्माती कंपनी भारतीय ऑटोमोबाईल मार्केटसाठी नवीन कार तयार करत आहे. या कारचे नाव 5 डोर जिम्नी (5 Door Jimny) असे असेल. ही एक ऑफ-रोडर कार असून ही कार भारतातील महिंद्रा थारला (Mahindra Thar) टक्कर देऊ शकते. सुझुकी ही SUV कार भारतात 5door/लाँग व्हीलबेस व्हर्जनमध्ये सादर करणार असून गाडीवाडी नावाच्या वेबसाइटने याबाबत माहिती दिली आहे. जरी लॉन्चिंग टाइमलाइनचा उल्लेख केलेला नसला तरी येत्या काळात भारतात लॉन्च होणार असलेल्या मारुती सुझुकीच्या या कारचे 5 महत्त्वाचे फिचर्स लीक झाले आहेत. हे फीचर्स आपण जाणून घेणार आहोत.
मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेत जिम्नीचे 5-डोर व्हेरिएंट लॉन्च करणार असल्याची पुष्टी झाली आहे. लांब व्हीलबेस असलेल्या जिम्नीचे स्पाय शॉट्स आधीच इंटरनेटवर लीक झाले आहेत. त्यामुळे सुझुकी जिम्नीचे मोठे व्हेरिएंट सादर करत आहे. जिम्नी 5-डोर व्हेरिएंटची लांबी 3,850 मिमी, रुंदी 1,645 मिमी आणि उंची 1,730 इतकी मिमी असेल. या एसयूव्हीचा व्हीलबेस 2,550mm असेल. तर, लांबी आणि व्हीलबेस 300 मिमीने वाढेल. व्हीलबेस विटारा ब्रेझापेक्षा थोडा लांब आहे.
- एक्सटीरियर डिझाईन : आगामी 5 डोअर जिम्नीला सध्याच्या 3 डोअर जिम्नीच्या तुलनेत बॉक्सी आणि रेट्रो इन्स्पायर्ड डिझाइन मिळेल. याचा व्हीलबेस 300 मिमी आहे. तसेच, सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत फ्रंट ग्रिल आणि बंपर वेगळ्या डिझाइनमध्ये बनवण्यात आले आहेत.
- इंटिरियर स्टायलिंग: डॅशबोर्ड आणि स्टीयरिंग व्हीलची रचना 3-डोर व्हर्जनसारखी असू शकते. या कारला आतून फॅमिली कार बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
- फीचर्सः आतापर्यंत लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार Maruti Suzuki Jimny 5door ला LED हेडलाइट्स मिळू शकतात. टेल लाइटमध्ये एलईडी लॅम्पही असतील. या कारमध्ये 7 इंचांची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करेल. यात हिल होल्ड असिस्टंटचेही फीचर आहे.
- पॉवरट्रेन: जिम्नी 1.5 लीटर नॅचरली अॅस्पिरेटेड, इनलाइन 4 पेट्रोल इंजिन भारतीय बाजारात उपलब्ध होईल. हे इंजिन 105 PS पॉवर आणि 138 Nm टॉर्क जनरेट करू शकते, जे इंटरनॅशनल व्हर्जनपेक्षा जास्त आहे. ट्रान्समिशनच्या पर्यायाबाबत बोलायचे झाले तर यामध्ये 5 स्पीड एमटी आणि 4 स्पीड एटीचा पर्याय दिला जाऊ शकतो.
- संभाव्य लॉन्च : मारुती सुझुकीच्या आगामी 5door जिम्नीची विक्री 2023 पासून सुरू होऊ शकते, मात्र कंपनीने अद्याप याबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. 5door व्हर्जन लवकरच भारतात सादर केलं जाईल आणि त्यानंतर ही कार इतर देशांमध्ये लॉन्च केली जाईल. या कारबाबत कंपनीकडून फारच कमी अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
इतर बातम्या
कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी, नितीन गडकरींनी जारी केलेले नियम लागू होणार
भारतात 1 एप्रिलपासून सर्व BMW कार महागणार, पाहा किती होणार दरवाढ
नवीन कलर थीम आणि स्पोर्टी लूकसह 2022 Yamaha YZF-R3 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स