मुंबई : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने आपल्या एसप्रेसो (S-Presso) आणि इको (Eeco) मधील संभाव्य दोषांमुळे 87,000 हून अधिक मॉडेल रिकॉल करण्याची घोषणा केली आहे. बाधित वाहनांना मारुती सुझुकीच्या अधिकृत डीलर वर्कशॉपला भेट द्यावी लागेल आणि दोष आढळल्यास ते दुरुस्त करावे. ज्यासाठी वाहन मालकांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मारूती सुझुकीने 5 जुलै 2021 ते 15 फेब्रुवारी 2023 दरम्यान बनवलेले काही मॉडेल परत मागवले आहेत. स्टीयरिंग टाय रॉडच्या एका भागामध्ये संभाव्य दोषामुळे मारुतीने 87,599 एसप्रेसो आणि इको यांना रिकॉल केले. बाधित वाहनांना मारुती सुझुकीच्या अधिकृत डीलर वर्कशॉपला भेट द्यावी लागेल जेणेकरून काही कमतरता आढळल्यास ती दुरुस्त करून घेता येणे शक्य होईल. त्यासाठी वाहनधारकांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.
मारुती सुझुकीने आपली वाहने परत मागवण्याची ही पहिलीच घटना नाही, याआधीही कंपनीने अनेक वेळा रिकॉल केले आहे. 2023 बद्दलच बोलायचे झाले तर, मारुतीने यापूर्वीच तीन वेळा आपली वाहने परत मागवली आहेत. जानेवारीत पहिली रिकॉल झाली. त्यानंतर कंपनीने 17,362 वाहनांना कॉल केले, तर दुसरे रिकॉल एप्रिलमध्ये 7,213 वाहनांसाठी जारी केले गेले आणि यावेळी 87,599 वाहनांसाठी तिसरे रिकॉल जारी केले गेले, ही एक मोठी रिकॉल आहे.
ऑटोमोबाईल कंपन्यांच्या कार रिकॉलबद्दल अनेकदा ऐकले जाते, काही काळानंतर वाहानांमध्ये तांत्रीक अडचण आल्याचे लक्षात येते. त्यानंतर कंपनीने आपल्या वाहनांसाठी रिकॉल जारी करून कार मालकांना माहिती देते. जेणेकरुन अखादे मोठे नुकसान किंवा अपघात होण्यापासून वाचता येईल. वाहनांवर आढळणारे हे दोष उत्पादनातील दोषांमुळे असतात. ज्याची तपासणी केल्यानंतर कंपनी त्या काळात उत्पादित केलेल्या सर्व वाहनांसाठी रिकॉल जारी करते. नियमानुसार याचा संपूर्ण खर्च कंपनीला करावा लागतो.