Maruti Suzuki Swift 2024 : नजर हटेच ना, मारुतीने केला धमाका, स्टायलिश स्विफ्ट बाजारात

| Updated on: May 09, 2024 | 3:13 PM

New Maruti Swift Launched : चौथ्या जनरेशनची मारुती सुझुकी स्विफ्ट अखेर भारतात दाखल झाली. कार खरेदीचा विचार असेल तर केवळ 11 हजार रुपयात तुम्ही ही कार बुक करु शकता. या कारमध्ये एकूण पाच व्हेरिएंट आहे. LXi, VXi, VXi (O), ZXi आणि ZXi+ अशी ही कार खरेदी करता येईल.

Maruti Suzuki Swift 2024 : नजर हटेच ना, मारुतीने केला धमाका, स्टायलिश स्विफ्ट बाजारात
नवीकोरी स्विफ्ट बाजारात
Follow us on

नवीकोरी मारुती सुझुकी स्विफ्टचा गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. आता या कारने बाजारात येताच धमाका केला आहे. नवीन स्विफ्टचे डिझाईन, फीचर्स आणि इंजिनमधील बदल ग्राहकांना वेगळा ड्रायव्हिंग फील देईल. ही कार अधिक स्टायलिश झाली आहे. कारच्या मायलेजमध्ये पण सुधारणा झाली आहे. ZXi+ हे या कारचे टॉप मॉडेल आहे. काय झाला बदल, किती आहे किंमत जाणून घेऊयात..

जुन्या स्विफ्टपेक्षा मोठा बदल

नवीन मारुती स्विफ्टमध्ये जुन्या स्विफ्टपेक्षा बरेच बदल करण्यात आले आहे. तिचा आकार वाढविण्यात आला आहे. नवीन कारची लांबी 3860mm, रुंदी 1695mm तर उंची 1500mm आहे. जुन्या मॉडेलपेक्षा ही कार लांबीत 15mm, रुंदीत 40mm आणि उंचीत 30mm इतकी जास्त आहे. दोन्ही मॉडल्सचा व्हीलबेस जवळपास सारखाच आहे. ही कार 9 रंगात उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा

Maruti Suzuki Swift 2024 चे फीचर्स

या कारमध्ये ऑल-ब्लॅक इंटिरिअर थीम देण्यात आली आहे. यामध्ये 40 हून अधिक कार कनेक्टेड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. कारमध्ये 9 इंचाचा स्मार्ट प्रो प्लस इंफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. याशिवाय कारमध्ये वायरलेस चार्जिंग, मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले, वाईड एंगल रिअर व्ह्यू कॅमेरा, रिअर एसी वेंट, 16-इंचाची ड्युअल टोन अलॉय व्हील्स,डिजिटल AC पॅनल, टाईप-A आणि टाईप्स-C USB चार्जिंग पोर्ट्स, LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, LED टेललॅम्प्स आणि LED फॉग लॅम्प सारखी फीचर्सची रेलचेल आहे.

Maruti Suzuki Swift 2024 चे इंजिन

नवीन मारुती स्विफ्टमध्ये सर्वात महत्वाचा बदल इंजिनमध्ये झाला आहे. यामध्ये नवीन 1.2 लिटर, 3-सिलेंडर, जेड-सीरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 82PS पॉवर आणि 112Nm चा टॉर्क जनरेट करते. इंजिनला माईल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीचा सपोर्ट आहे. त्यामुळे कारला जास्त मायलेज आणि शक्ती मिळते. नवीन स्विफ्टला 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक असे दोन्ही गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. मारुती सुझुकीच्या दाव्यानुसार, जुन्या Swift च्या तुलनेत नवीन स्विफ्टचे मॅन्युअल मॉडल 10 टक्के तर ऑटोमॅटिक मॉडल 15 टक्के जास्त मायलेज देते. कंपनी लवकरच नवीन स्विफ्टचे CNG मॉडल पण घेऊन येणार आहे.

नवीन मारुती स्विफ्टची किंमत किती

नवीन मारुती स्विफ्टची किंमत 6.49 लाख रुपयांपासून सुरु होते. या मॉडलचे टॉप व्हेरिएंटची किंमत 9.65 लाख रुपयांच्या घरात आहे. या सर्व किंमती एक्स-शोरुमच्या हिशोबाने आहेत. जुन्या स्विफ्टची किंमत 6.24 लाख रुपयांपासून सुरु होत होती. भारतीय बाजारात या नव्या कोऱ्या स्विफ्टचा सामना Hyundai Grand i10 Nios आणि Tata Tiago सोबत होईल.