मुंबई | 8 मार्च 2024 : साल 2024 च्या दुसऱ्या महीना फेब्रुवारीत मारुती सुझुकी कारची सर्वाधिक विक्री झाली आहे. देशातील सर्वाधिक खरेदी झालेल्या टॉप टेन पॅसेंजर कारमध्ये बहुतांश कार मारुती सुझुकी कंपनीच्या आहेत. तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की कोणती कार सर्वाधिक विक्री झाली आहे. टॉप टेनमध्ये कोण कोणत्या कंपन्यांच्या कोण कोणत्या सेंगमेंटच्या कार आहेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मारुती सुझुकीची फॅमिली हॅचबॅक कार वॅगनआरने बलेनोला मागे टाकीत फेब्रुवारी 2024 मध्ये बेस्ट सेलिंग कारचा मान पटकवला आहे.
गेल्या महिन्यात ( फेब्रुवारी ) मारुती सझुकी वॅगन आर कार सर्वात विक्री झालेली कार ठरली आहे. त्या आधी जानेवारी महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या कारमध्ये मारुतीच्याच बलेनो ( Maruti Baleno ) कारने टाटा पंच (Tata Punch), मारुती डिझायर (Dzire), मारुती ब्रेझा (Maruti Brezza), मारुती अर्टीगा (Maruti Ertiga), हुंडई क्रेटा (Hyundai Creta), महिंद्र स्कॉर्पिओ सीरीज (Mahindra Scorpio N & Classic), टाटा नेक्सॉन (Tata Nexon) आणि मारुती फ्रॉन्क्स (Maruti Fronx) सारख्या सेगमेंट बेस्ट कारना मागे टाकले होते. तर गेल्या फेब्रुवारीत खरेदी झालेल्या टॉप 10 कार संदर्भात माहीती पाहूयात…
गेल्या फेब्रुवारी 2024 मध्ये देशातील 19,412 लोकांनी मारुती सुझुकी वॅगनआर कार विकत घेतली. गेल्यावर्षी याच फेब्रुवारी महिन्यात वॅगरआरचे 16,889 यूनिट विकले गेले. या कमी बजटच्या हॅचबॅक कारची वार्षिक विक्री सुमारे 15 टक्के वाढली आहे. वॅगनआर कारची मासिक विक्री देखील वाढली आहे. जानेवारी 2024 मध्ये या कारला 17,756 ग्राहकांनी खरेदी केले होते.