मारुती सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रीक कारची लॉंचिंगची संपूर्ण तयार झाली आहे. या उद्या 4 नोव्हेंबरला पहिली इलेक्ट्रीक कार eVX चे उद्घाटन केले जाणार आहे. हा सोहळा इटलीच्या मिलान शहरात होणार आहे. सुझुकी कंपनीसाठी ही इलेक्ट्रीक कार भारतातच नाहीत जागतिक बाजारपेठेतही महत्वाची असणार आहे. भारतात या कारला तगडी स्पर्धा टाटा मोटर्स आणि महिंद्र या कंपन्यांच्या इलेक्ट्रीक कारशी असणार आहे.
मिलान शहरात ज्या मारुती eVX कारला सादर केले जाणार हे हिचे अंतिम प्रोडक्शन व्हर्जन असल्याने हे मॉडेल मार्केटमध्ये विकले जाणार आहे. मेड-इन- इंडिया मारुती eVX च्या मोठ्या हिश्शाला निर्यात केले जाणार आहे. भारतात तयार झालेली ही इलेक्ट्रीक एसयु्व्ही युरोप आणि जपानच्या बाजारात निर्यात होणार आहे.
मारुती सझुकी eVX च्या वैशिष्ट्यांची माहिती कंपनीने अजून उघड केलेली नाही. परंतू सूत्रांच्या मते ही मारुतीच्या नव्या इलेक्ट्रीक कारला दोन बॅटरी पॅक पर्यायात सादर केले जाणार आहे. 48kWh आणि 60kWh असे ते दोन पर्याय असणार आहेत. एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही कार सुमारे 500 किमीपर्यंत धावू शकते असे म्हटले जात आहे.
या कारमध्ये फ्लोटिंग टाईप टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, नवीन डिझाईनचे डॅश बोर्ड आणि कंट्रोल स्वीच, ड्रायव्हींग मोड्स साठी रोटरी डायल आणि लेदर सीट्स आदी फिचर असू शकतात.
याशिवाय टु-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि ऑटोमेटिक क्लाईमेंट कंट्रोल सारखे फिचर असतील.
मारुती सुझुकी कंपनीच्या गुजरात येथील प्लांटमध्ये मारुतीच्या नव्या इलेक्ट्रीक कारची निर्मिती होणार आहे. हे काम साल 2025 पासून सुरु होऊ शकते. इटलीत 4 नोव्हेंबरला लॉंचिंग झाले तर इंडियात ही कार जानेवारी 2025 मध्ये होणार्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये सादर केली जाईल असे म्हटले जात आहे. सध्याच्या इलेक्ट्रीक कार तसेच येणाऱ्या Tata Curvv EV तसेच Creta EV इलेक्ट्रीक कारशी तिचा सामना होणार आहे.