मारुतीच्या इतर सीएनजी वाहनांप्रमाणेच कंपनीने एस-सीएनजी टॅगसह सीएनजी लाँच केली आहे. कंपनीने सीएनजी टँकचे वजन अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी स्विफ्टचे सस्पेन्शन आणि ब्रेक देखील पुन्हा ट्यून केले आहेत.
नवीन मारुती स्विफ्ट CNG 1.2-लीटर पेट्रोल मोटर इंजिनद्वारे समर्थित असेल. जे 81 bhp आणि 113 Nm टॉर्क निर्माण करेल.
पेट्रोल आणि सीएनजी सुरक्षितपणे बदलण्यासाठी कंपनीनं त्यात दुहेरी परस्परावलंबी ECUs तंत्रज्ञान वापरले आहे.
CNG इंजिनबद्दल बोलायचे झाले तर ते 70 bhp आणि 95 Nm जास्तीत जास्त टॉर्क निर्माण करेल.
ही कार 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येत आहे. नवीन सीएनजी कार ऑटोमॅटिक प्रकारात उपलब्ध होणार नाही. सीएनजीचे मायलेज 30.9 किमी प्रति किलो असेल असा कंपनीचा दावा आहे.