Maruti Suzuki India | पुढील 6 महिन्यात दिसणार Maruti चा जलवा, 3 नव्या कार होणार लॉंच

| Updated on: Aug 06, 2022 | 11:53 AM

Maruti Suzuki India | मारुती सुझुकी इंडिया ही कंपनी पुढील सहा महिन्यांमध्ये 3 नव्या कार लॉँच करणार आहे. या महिन्यात, ऑगस्टमध्ये मारुति ऑल्टो 10, त्यानंतर मारुति ऑल्टो 800 आणि त्यानंतर अजून एक कार बाजारात येण्यासाठी तयार आहे.

Maruti Suzuki India | पुढील 6 महिन्यात दिसणार Maruti चा जलवा, 3 नव्या कार होणार लॉंच
पुन्हा दमदार पाऊल
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Maruti Suzuki India | मारुती सुझुकी इंडिया ही कंपनी (Maruti Suzuki India) या वर्षी भारतात अनेक नव्या कार लॉंच ( 3 new cars) करण्यास तयार असून काही जुन्या कारचे अपडेटेड व्हर्जनही आणण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये हायब्रीड कारपासून एसयुव्ही (SUV) पर्यंत वेगवेगळ्या गाड्यांचा समावेश आहे. मारुती कंपनीने नुकतेच हायब्रिड कार ग्रँड व्हिटारा लॉंच केली असून ती एक एसयूव्ही आहे. येत्या 6 महिन्यात (within next 6 months) कंपनीतर्फे आणखी कोणकोणत्या कार लाँच होतील ते जाणून घेऊया. मारुती सुझुकी कंपनीने यापूर्वी भारतीय बाजारात मारुती सुझुकी ऑल्टो 10 चे मॉडेल डिस्कंटीन्यू (Discontinue) केले असून त्याजागी न्यू कार ‘एस प्रेसो’ सादर केली आहे. आता नवी ऑल्टो 10 कार लवकरच बाजारात येणार असून ती हार्टेक्स प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येईल. यापूर्वी न्यू मारुती सिलेरिओ, मारुती व्हॅगनार , मारुती एस प्रेसो या कारही त्या प्लॅटफॉर्मवर तयार केल्या होत्या.

नव्या ऑल्टो 10 मध्ये ग्राहकांना 1.0 लीटरचे 10 सी पेट्रोल इंजिनचा वापर करण्यास मिळेल. या इंजिनामध्ये 66 एचपी पॉवर आणि 89 एनएमचे टॉर्क जनरेटरही मिळतो. नव्या ऑल्टो 10मध्ये ग्राहकांना नवे केबिन आणि अजून काही नवे फीचर्स पहायला मिळतील. त्यामुळे नवे ग्राहक आकर्षिले जातील.

2022 मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा

यापूर्वी मारुती कंपनीने नवी कार ग्रँड व्हिटारा एसयूव्ही लॉंच केली होती आणि आता या नव्या कारची या किंमत जाहीर होईल. या कारची स्पर्धा सेल्टॉस, फॉक्सव्हॅगन टायगुन, स्कोडा कुशाक यासारख्या कारशी होणार आहे. या कारमध्ये दोन प्रकारची इंजिन देण्यात आली असून ज्यापैकी एक इंजिन 1.5 लिटर माइल्ड हायब्रिड कारआहे तर दुसऱ्या प्रकारचे इंजिन 1.5 लिटर स्ट्राँग हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

अपकमिंग वायटीबी एसयूव्ही कार

मारूती बलेनो वर आधारित ही नवी कार तयार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार या वर्षाअखेरीसपर्यंत किंवा नव्या वर्षाच्या सुरूवातीला बाजारात दाखल होईल. ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार असेल. या कारची स्पर्धा रेनो किगर, निशान मॅग्नाइट आणि किआ सोनेट यांसारख्या कार्सशी होईल.

6 कार लॉन्च

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) भारतीय बाजारपेठेत आपली लाइन-अप आणखी मजबूत करण्यात गुंतलेली आहे. कंपनीनं अलीकडेच आपली सर्व-नवीन ग्रँड विटारा सादर केली आणि मध्यम आकाराच्या एसयूव्ही (SUV) विभागातही प्रवेश केला. ही SUV लवकरच सणासुदीच्या आधी लाँच आहे. याशिवाय मारुती सुझुकीने या वर्षी आपले अनेक नवीन मॉडेल्स लाँच केले आहेत. फेब्रुवारी 2022 पासून आत्तापर्यंत मारुती सुझुकीनं आपल्या 6 कार भारतीय बाजारपेठेत नवीन अवतारात लाँच केल्या आहेत.