जर्मन लक्झरी कार ब्रँड मर्सिडीज-बेंझने (Mercedes Benz) आज एक नवीन इलेक्ट्रिक सेडन कार लाँच केली आहे. कंपनीने मर्सिडीज EQS AMG 53 4Matic+ भारतात आणली आहे. नवीन कार मर्सिडीज-बेंझची पहिली ऑल-इलेक्ट्रिक एएमजी कार (electric car) आहे. एका चार्जवर ही कार 570 किमीपर्यंत रेंज मिळवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. येत्या पाच वर्षांत मर्सिडीजच्या भारतातील एकूण विक्रीत इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा 25 टक्के असेल. यासाठी कंपनी 2022 मध्ये भारतात तीन नवीन इलेक्ट्रिक कार आणणार आहे. त्याची सुरुवात आज मर्सिडीज-बेंझ EQS AMG 53 4Matic+ लाँच करून होत आहे. न्यू इलेक्ट्रिक सेडन कारची सुरुवातीची एक्सशोरूम किंमत (ex showroom price) 2.45 कोटी रुपये आहे.
मर्सिडीज EQS AMG 53 4Matic+ कार कॉम्प्लेटली बिल्ट युनिट (CBU) मार्गाने भारतात आणली जाईल. ग्राहकांना 2 वर्षे / 30,000 किमीची सर्व्हिस वॉरंटी आणि 10 वर्ष/2,50,000 किमीची बॅटरी वॉरंटी मिळेल. TOI नुसार, अपकमिंग कार ही भारतातील सर्वोच्च EV आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार एका चार्जवर 529-586 किमीपर्यंत रेंज देईल.
अत्याधुनिक मर्सिडीज कारमध्ये डीआरएलसोबत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एलईडी लाइटिंग देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक कार असल्याने तिच्या ग्रिलला स्पोर्टी डिझाइन देण्यात आले आहे. त्याच वेळी, कारच्या मागील बाजूस उत्कृष्ट लाईटींगदेखील बघायला मिळणार आहे. कारच्या मागील बॅक लाइटला 3D कर्व मिळाला आहे. मर्सिडीजच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे कंपनीने आज सांगितले आहे, की ती पुढील महिन्यात भारतात EQS 580 देखील लॉंच करणार आहे.
2022 EQS ही 56 इंचाची MBUX हायपरस्क्रीन असलेली मर्सिडीजची भारतातील पहिली कार आहे. हायपरस्क्रीन गोरिल्ला ग्लासच्या आत तीन स्वतंत्र OLED डिस्प्लेसह एकत्रित केले आहे. हे 8 CPU कोर आणि 24GB RAM ला सपोर्ट करते. नवीन इलेक्ट्रिक सेडन कारमध्ये 107.8kWh क्षमतेचे बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ही कार केवळ 3.4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते आणि तिचा वेग 250 किमी प्रतितास इतका आहे.