बहुप्रतीक्षित 2021 Mercedes-Benz GLC-Class भारतात लाँच, किंमत फक्त…

| Updated on: Jan 22, 2021 | 11:18 PM

जर्मन लक्झरी कार निर्माती कंपनी मर्सिडीज-बेंझने (Mercedes-Benz) भारतात नुकतीच त्यांची लोकप्रिय एसयूव्ही GLC चं 2021 वेरियंट (2021 Mercedes GLC) लाँच केलं आहे.

बहुप्रतीक्षित 2021 Mercedes-Benz GLC-Class भारतात लाँच, किंमत फक्त...
Follow us on

मुंबई : जर्मन लक्झरी कार निर्माती कंपनी मर्सिडीज-बेंझने (Mercedes-Benz) भारतात नुकतीच त्यांची लोकप्रिय एसयूव्ही GLC चं 2021 वेरियंट (2021 Mercedes GLC) लाँच केलं आहे. या व्हीकलची किंमत 57.40 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते. मर्सिडीज-बेंझ इंडियाने एका निवेदनात म्हटलं आहे की, नवीन एसयूवही GLC 200 पेट्रोल आणि GLC 220d डिझेल वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. मर्सिडीज-बेंझ GLC च्या टॉप मॉडेलची किंमत 63.15 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) इतकी आहे. (Mercedes-Benz launches 2021 edition of SUV GLC at Rs 57.40 lakh onwards)

मर्सिडीज-बेंझ GLC मध्ये लेटेस्ट कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, ‘मर्सिडीज मी कनेक्ट’, अॅलेक्सा होम, गुगल होम, नेविगेशन सिस्टिम आणि अॅपवर पार्किंग लोकेशनसारखे फीचर्स सपोर्ट करतात. कंपनीने म्हटलंय की, या SUV मध्ये रिमोट इंजिन स्टार्ट फिचरचा समावेश आहे. मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रोडक्ट लाईन-अपमध्ये पहिल्यांदाच एखाद्या SUV च्या फ्रंट सीटमध्ये मसाज फंक्शन देण्यात आलं आहे. फ्रंट एंट्री एयर कंडीशनिंगद्वारे कारमध्ये बसण्यापूर्वीच रिमोटद्वारे कारमधील तापमान थंड करता येईल.

नवीन मर्सिडीजच्या लाँचिंगबाबत सांगताना मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मार्टिन श्वेनक म्हणाले की, “GLC आमच्या एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात खास कार आहे. GLC ही कार गेल्या वर्षी आमच्या सर्व कार्सपैकी सर्वाधिक विकली गेलेली कार आहे. नवीन SUV सह आता आम्ही अधिक दमदार तंत्रज्ञान सादर करत आहोत. ही एक मीडियम साईज (मध्यम आकाराची) एसयूव्ही आहे. तिच्या सेगमेंटमध्ये या व्हीकलने टेक्नोलॉजी, आराम आणि सुविधेबाबत एक बेंचमार्क सेट करुन ठेवला आहे. आम्हाला विश्वास आहे की, लेटेस्ट टेक्नोलॉजी आणि सुविधांसह सादर करण्यात आलेली GLC तिचं मार्केटमधील प्रस्थ कायम राखेल, आणि प्रीमियम मिड-साईझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये अधिक लोकप्रिय होईल.

2020 मध्ये GLC ही कार मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या पोर्टफोलियोमधील सर्वाधिक विक्री झालेली कार आहे. कंपनीने 2016 मध्ये ही कार भारतात लाँच केली होती. गेल्या चार वर्षांमध्ये GLC च्या 8,400 युनिट्सची विक्री झाली आहे. मर्सिडीज-बेंझच्या 2021 जीएलसीच्या इतर फीचर्समध्ये MBUX युजर इंटरफेस, वायरलेस चार्जिंग, क्रुझ कंट्रोल, डायनॅमिक सिलेक्ट, एम्बियंट लायटिंगसह अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ही नवी एसयूव्ही मार्केटमध्ये बीएमडब्ल्यू एक्स 3, वोल्वो एक्ससी 60, लँड रोवर डिस्कवरी स्पोर्ट या गाड्यांना टक्कर देणार आहे.

हेही वाचा

Audi ची Q5 facelift लाँच होण्यास सज्ज, भारतात टेस्टिंग पूर्ण

Tesla ला टक्कर देण्यासाठी Mercedes ची शानदार इलेक्ट्रिक कार लाँच, 8.9 सेकंदात 100 किमी वेग पकडणार

(Mercedes-Benz launches 2021 edition of SUV GLC at Rs 57.40 lakh onwards)