नागपुर : जगात अनेक असामान्य घटना घडत असतात. विज्ञानाने मागच्या शतकापासून अनेक क्रांतीकारक शोध लावले. तरीही काही घटनांपुढे विज्ञानाचे शोधही कमी पडतात. अशा अनेक घटना घडतात, ज्यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. अशीच घटना नागपूरमध्ये 24 वर्षांआधी घडली होती.
36 वर्षाचा संजू भगत याचे पोट इतके वाढले होते की लोक त्याला ‘प्रेग्नेंट माणूस’ म्हणून हिणवू लागले होते. लहान असताना संजूला काही त्रास झाला नाही पण जसं जसं त्याचं वय वाढू लागलं तसं त्याचं पोट जास्तच फुगलं. संजूच्या घरच्यांना वाटलं, त्याच्या पोटाला सूज आली असावी आणि त्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. पण संजूचे पोट जास्तच फुगल्यावर घरच्यांनी त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आलं.
ज्या वेळी संजूला दवाखान्यात भरती करण्यात आले, त्यावेळी डॉक्टरांनी वाटले त्याच्या पोटात ट्यूमर असेल. त्यामुळेच त्याचे पोट इतके वाढले आहे. डॉक्टरांनी त्याचं ऑप्रेशन करण्याचा निर्णय घेतला. संजूचं ऑप्रेशन करण्यासाठी त्याचं पोट फाडल्यावर डॉक्टरांना धक्काच बसला. त्याच्या पोटातून डॉक्टरांना हाड, त्वचा, जबडा, केस, आणि गुप्तांग मिळाले. संजूच ऑप्रेशन करणाऱ्या डॉ. अजय मेहता यांना हे सर्व पाहून धक्काच बसला.
डॉक्टरांनी जेव्हा संजूच्या पोटातून हे सर्व अवयव काढले तेव्हा ते खूप घाबरले. त्यांनी सांगितले त्याच्या पोटात जुळी मुलं होतात. जे आईच्या पोटात वाढण्याआधीच दूसऱ्या मुलाच्या भ्रुणात वाढते. ही एक अतिशय तुरळक घटना असते असे डॉक्टरांनी सांगितले. हि घटना ज्या आईच्या पोटात जुळे मुलं असतात, त्याच्या शरीरातच घडू शकते. या परिस्थितीला मेडिकलमध्ये ‘फीटस इन फीटू’ असे म्हणतात.
फीटस इन फीटू ही एक अतिशय तुरळक कंटीशन आहे. जगभरात आतापर्यंत अशा 200 पेक्षा जास्त घटना घडल्या आहे. ज्यावेळी आईच्या गर्भात जुळे मूलं असतात, पण काही कारणाने त्यातील एकाची वाढ न होता, दुसऱ्या मुलाच्या शरीरावर अवलंबून राहते. गर्भातील दुसऱ्या भ्रूणात त्याचे भ्रूण तसेच राहते. कालंतराने जन्म झालेल्या मुलाच्या शरीरात त्याचे भ्रूण वाढते. वाढलेल्या भ्रूण ट्युमर सारखे दिसते. कालंतराने त्या व्यक्तीचे पोट खूपच फूगते आणि तो गरोदर असल्याचे भासते. हे भ्रूण पुरुष किंवा स्त्री कोणाच्याही शरीरात वाढू शकतं.