मुलाचा हट्ट, नांदेडच्या मेकॅनिक बापाचा भन्नाट जुगाड, भंगारातील सामानापासून टकाटक बाईक
लहान मुलं नेहमीच आपल्या आई-वडिलांकडे वेगवेगळे हट्ट करत असतात. आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती कशीही असो, ते आपल्या मुलांचे हट्ट पुरवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. नांदेडमधल्या एका मेकॅनिकने आपल्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी चक्क भंगारातलं साहित्य वापरुन जब्बरदस्त मोटारसायकल बनवली आहे.
1 / 5

2 / 5
नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथील उमेश महाजन यांनी जुगाड करून आपल्या मुलासाठी मोटारसायकल बनवली आहे. उमेश महाजन हे मागील काही वर्षापासून हिमायतनगरमध्ये मोटरसायकल दुरुस्तीचे काम करतात.
3 / 5
महाजन यांच्या मुलाने 'बाबा मला पण गाडी पाहिजे' असा हट्ट धरला होता आणि त्यासाठी वडिलांनी भंगारातील साहित्य वापरुन मोटारसायकल बनवली आहे.
4 / 5
ही मोटारसायकल बनवण्यासाठी महाजन यांना 10 ते 12 हजार रुपये खर्च आला असून, ही मोटारसायकल एक लिटर पेट्रोलमध्ये 50 ते 55 किलोमीटर धावते.
5 / 5
ही गाडी पाहण्यासाठी पाहण्यासाठी परिसराती नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. महाजन यांनी पेट्रोल र चालणारी गाडी बनवली असून, या पुढे प्रदूषण होणार नाही आणि पैश्याची बचत होईल या संकल्पनेवर ई-सायकल बनवण्याची संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.