देशातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी एक असलेली मारुती ऑल्टो K10 (Maruti Suzuki Alto K10) कमबॅकसाठी तयार आहे. ऑल्टोचे न्यू जनरेशन मॉडेल (New Model of car) डीलर्सपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली असून आज ही कार लाँच होणार आहे. मारुतीच्या या कारची किंमत (Price will be declared today) आजच जाहीर होणार आहे. भारतीय बाजारात रेनॉ क्विड ही एक अशी कार आहे, जिची स्पर्धा ऑल्टो K10 शी होणार आहे. त्याशिवाय बाकीच्या गाड्यांची मॉडेल्स, कमी विक्रीमुळे बाजारातून हटवण्यात आली आहेत. मारुती ऑल्टो K10 चे बूकिंग आधीपासूनच सुरू झाले आहे. 11 हजार रुपयांमध्ये तुम्ही नवी ऑल्टो बूक करू शकता. जाणून घेऊया मारुती ऑल्टो K10 चे फीचर्स आणि तिची किंमत..
मारुती सुझुकी ऑल्टोच्या नव्या मॉडेलचे एक्सटीरिअर ( बाह्यभाग) खूपच आकर्षक असेल. नव्या ऑल्टो कारची उंची आधीच्या कारपेक्षा जास्त असेल तर या कारच्या नव्या डिझाईनमुळे आतमध्ये जास्त जागा मिळेल. मारुती सुझुकी ऑल्टोचे हे नवे मॉडेल सहा रंगांमध्ये उपलब्ध असेल. त्यामध्ये गोल्ड, सिल्की व्हाईट, स्पीडी ब्ल्यू, सॉलिड व्हाईट, सिझलिंग रेड आणि ग्रॅनाईट ग्रे या रंगांचा समावेश असेल.
मारुती सुझुकी ऑल्टोच्या नव्या मॉडेलमध्ये नव्या डॅशबोर्डचा वापर करण्यात आला आहे. यामुळे कारच्या केबीनला एक फ्रेश लूक मिळेल. या नव्या येणाऱ्या ऑल्टोमध्ये रेअर पार्किंग सेंसर , ABS आणि ड्युएल फ्रंट एअरबॅग्ज यांसारखे सेफ्टी फीचर्स मिळणार आहेत. तसेच ग्राहकांना या कारमध्ये ॲंड्रॉईड ऑटो आणि ॲपल कार प्ले सह 7 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, इलेक्ट्रिकली ॲडजेस्टेबल OVRMs, पॉवर विंडो आणि रिमोट यांसारखे अनेक फीचर्स मिळणार आहेत.
मारुती सुझुकी ऑल्टो K10 कारमध्ये 1.0 लीटर K10C ड्युएल जेट पेट्रोल इंजिनची पॉवर मिळणार आहे. हे तेच इंजिन आहे, ज्याचा वापर सेलेरिओ आणि एस-प्रेसो यामध्येही करण्यात आला आहे. ग्राहकांना यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड AMT ट्रान्समिशन मिळेल. तर ही नवी ऑल्टो K10 कार 20 किलोमीटर प्रटि लीटरचे संभाव्य मायलेज देऊ शकते.
मारुती सुझुकी ऑल्टो च्या सध्याच्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 3.39 लाख रुपयांपासून सुरू होते. त्यामुळेच मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी ऑल्टो K10 ची एक्स-शोरूमची संभाव्य किंमत 3.50 लाख ते 3.75 लाख रुपयांपर्यंत असू शकते. या कारची विक्री ऑल्टो 800 सह होणार आहे. भारतात नव्या मारुती सुझुकी ऑल्टो K10 ची स्पर्धा रेनॉ क्विड कारसोबत होणार आहे.