मुंबई : ब्रिटीश मोटारसायकल निर्माती कंपनी Triumph दीर्घ काळापासून भारतात आपली ट्रायडंट 660 बाईक (Triumph Trident 660) लाँच करण्याची योजना करत आहे. या बाईकच्या लाँचिंगबाबत सतत कयास सुरू होते, त्यानंतर आता कंपनीने बाइकची टीझर इमेज जारी केली आहे. तसेच कंपनीने या बाईकच्या लाँचिंगची तारीख जाहीर केली नसली तरी लवकरच ती बाजारात आणली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. (New Triumph Trident 660 to be launched in India very soon)
ट्रायम्फ इंडियाच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आलेल्या टीझर इमेजमध्ये दुचाकीची केवळ हेडलाइट पाहायला मिळाली आहे. तसेच त्यामध्ये लिहिले आहे की लवकरच ट्रायम्फ ट्रायडंट 660 (Triumph Trident 660) बाजारात सादर केली जाईल. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या बाईकसाठी बुकिंग सुरू झाले आणि तेव्हापासून लोक या बाईकच्या प्रतीक्षेत आहेत.
या बाईकच्या इंजिनविषयी बोलायचे झाले तर 2021 ट्रायम्फ ट्रायडंट 660 (2021 Triumph Trident 660) ला एक नवीन 660cc ट्रिपल सिलेंडर इंजिन मिळेल जे 10,250 आरपीएम वर जास्तीत जास्त 80bhp पॉवर आणि 6,250 आरपीएम वर 64nm पीक टॉर्क जनरेट करेल. या इंजिनसह स्लिप आणि असिस्ट क्लचसह 6 स्पीड गिअरबॉक्स देखील उपलब्ध असेल.
2021 Triumph Trident 660 मध्ये तुम्हाला नवीन-रेट्रो स्टाईल राऊंड एलईडी हेडलॅम्प्स, बीफी फोर्क्स, सेल्फ-कॅन्सिलिंग एलईडी इंडिकेटर अशी वैशिष्ट्ये मिळतील. याशिवाय यामध्ये एलईडी लायटिंग, राऊंड कन्सोलवर पूर्णपणे डिजिटल युनिट मिळेल, ज्यामध्ये स्पीड, रीव्ह्ज, फ्यूल स्टेट आणि सिलेक्टेड गियरची माहिती मिळेल. तसेच या बाईकच्या खालच्या बाजूला हाफ कलर टीएफटी पॅनेल असेल, ज्याद्वारे आपण आपला स्मार्टफोन कनेक्ट करू शकता. यासाठी, आपल्याला एक स्वतंत्र मॉड्यूल खरेदी करावे लागेल.
या बाईकच्या किंमतीबद्दल कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही, परंतु 7 लाख रुपयांच्या किंमतीसह ही बाईक बाजारात सादर केली जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तथापि, आपल्याला ही बाईक बुक करायची असल्यास टोकनची रक्कम 50,000 रुपये देऊन तुम्ही बुकिंग करू शकता. भारतात ही बाईक कावासाकी झेड 650 (Kawasaki Z650) आणि होंडा सीबीआर 650 आरशी (Honda CBR650R) स्पर्धा करेल.
Pure. Triple. Advantage.
Coming your way very soon.#Trident660 #TriumphTrident #ForTheRide #TriumphIndia pic.twitter.com/zuhbRX9hrY— TriumphIndiaOfficial (@IndiaTriumph) March 18, 2021
इतर बातम्या
अवघ्या 85 हजारात खरेदी करा 2.13 लाखांची Royal Enfield Thunderbird 500
Ducati च्या दोन शानदार बाईक्स बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Honda CB 350 RS vs H’Ness CB 350 : तुमच्यासाठी परफेक्ट बाईक कोणती?
अवघ्या 26 हजारात खरेदी करा 67 हजारांची Hero Passion Pro
(New Triumph Trident 660 to be launched in India very soon)