नवी दिल्ली | 24 February 2024 : कार खरेदी करायची अनेकांची इच्छा असते. पण इतर जबाबदाऱ्या कर्जबाबतच्या अडचणी यांचा त्यांना सामना करावा लागतो. त्यातच आता इलेक्ट्रिक कारचा जमाना आला आहे. पेट्रोल-डिझेलच्या महागाईवर मात करण्यासाठी सरकार या कारच्या उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. तर खरेदीसाठी बँका पण अनेक ऑफर्स आणत आहेत. इलेक्ट्रिक कारच्या खरेदीसाठी कर्जावर विशेष सवलत आणि इतर ऑफरचा भडीमार करत आहे. तर एसबीआय इलेक्ट्रिक कार खरेदीवर मोठी सवलत देत आहे. तुम्ही या कर्जासाठी अर्ज केल्यास झटपट कार घरी आणू शकता.
एसबीआयची विशेष योजना
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, एसबीआयने इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी एक विशेष योजना बाजारात आणली आहे. 21 वर्षापासून ते 70 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला ही बँक ईव्हीसाठी कर्ज देते. तुम्ही 3 ते 8 वर्षापर्यंतच्या कर्जासाठी सुलभ पद्धतीने हप्ता देऊ शकतात. ईव्ही कारच्या कर्जावरील व्याजावर वाहन कर्जासाठी विशेष, 0.25 टक्क्यांची सूट देण्यात येत आहे. तुम्हाला इलेक्ट्रिक कारच्या ऑनरोड किंमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्जाची सुविधा मिळते. तर काही खास मॉडेलवर तुम्हाला 100 टक्के कर्जाची सुविधा देण्यात येत आहे. त्यामुळे खिशात दमडी नसतानाही तुमचे कार खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
किती कर्ज आणि किती व्याज
कर्ज घेताना या गोष्टींवर लक्ष द्या
जर तुम्ही पगारदार असाल आणि इलेक्ट्रिक कारसाठी कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्याकडे गेल्या 6 महिन्यातील बँक खात्यातील सविस्तर माहिती द्यावी लागेल. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, ओळखपत्र, एड्रेस प्रुफ इतर संबंधित कागदपत्रं द्यावी लागतील.