नवी दिल्ली : जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे असेल तर आता तुम्हाला फार त्रास सहन करावा लागणार नाही, कारण सरकारने 1 जुलै रोजी नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या बदलानंतर, अर्जदारांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी अधिक कठीण प्रक्रियेतून जाण्याची गरज नाही. या संदर्भात आजपासून केंद्रीय रस्ता मंत्रालयाचा सुधारीत नियम लागू झाला आहे. वास्तविक परिवहन मंत्रालयाने वाहन चालवण्याच्या प्रशिक्षण केंद्रांना मान्यता देण्यासाठी नवीन नियम अधिसूचित केले आहेत. येथे अर्जदारांना उच्च दर्जाचे ड्रायव्हिंग कोर्स उपलब्ध करुन दिले जातील आणि एकदा चाचणी झाल्यावर त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स घेताना ड्रायव्हिंग टेस्टमध्ये सवलत देण्यात येईल. (Now it is easy to get a driving license, know what the new rules are)
नवीन नियमांनुसार, अधिकृत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण केंद्रे उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी सिमुलेटरसह समर्पित ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकसह सुसज्ज असतील. येथे अर्जदारांना वाहन चालविण्याचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून ते वाहन चालविण्याच्या मूलभूत गोष्टी शिकू शकतील आणि रस्त्यावर उत्तम प्रकारे वाहन चालवू शकतील.
नव्या अधिसूचनेनुसार, मान्यताप्राप्त वाहन चालक केंद्रांमधील लाइट मोटर वाहन ड्रायव्हिंग कोर्सचा कालावधी सुरू होण्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 4 आठवड्यांच्या कालावधीत 29 तास असेल. याचा अर्थ असा आहे की अर्जदाराला कोर्स सुरू झाल्यापासून 4 आठवड्यांत वाहन चालविणे शिकावे लागेल. या कोर्समध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही समाविष्ट असतील.
या व्यतिरिक्त, अवजड मोटर वाहन चालविण्यास शिकण्याचा कालावधी 6 आठवड्यात 38 तास आहे. त्यात थेअरी आणि प्रॅक्टिकल देखील समाविष्ट आहे. त्याशिवाय वाहनचालकांना रस्ते संबंधित इतर आवश्यक नियमांसह नैतिक आणि विनम्र व्यवहाराविषयी काही मूलभूत बाबी देखील शिकवल्या जातील.
हलके व अवजड वाहने चालविण्याशिवाय या केंद्रांवर उद्योगाशी संबंधित इतर वाहनांचेही प्रशिक्षण दिले जाईल. सरकारच्या म्हणण्यानुसार या नियमांमुळे कुशल वाहनचालकांची कमतरताही भरून निघेल. या मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रांना दिलेली मान्यता पाच वर्षांच्या कालावधीसाठी वैध असेल. (Now it is easy to get a driving license, know what the new rules are)
नाशिक स्मार्ट सिटीला नवा कारभारी, प्रकाश थविल यांची बदली, नगरसेवकांच्या मागणीला यशhttps://t.co/Y46pXxeYWQ#Nashik | #SmartCity | #NashikNews |
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 2, 2021
इतर बातम्या
पाकिस्तानचा स्वस्त कांदा बाजारपेठेत, बांगलादेशच्या सीमा बंद, कांदा 5 रुपयांनी स्वस्त
आर्थिक देवाणघेवाण झाली की जरंडेश्वर कारखान्याचं प्रकरण आपोआप मिटेल: राजू शेट्टी