कारचे (Car Lovers) शौकिन असणाऱ्यांना खूपच इंटरेस्टिंग आणि उत्सुकता वाढवणारी बातमी समोर आली आहे. अखेर ओला इलेक्ट्रीक कारच्या फर्स्ट लूकआधी या कार बाबत महत्त्वाची गोष्ट समोर आलीय. विशेष म्हणजे ओला इलेक्ट्रीक ही कार (Ola Electric Car First Look) आतापर्यंतच्या भारतातील इलेक्ट्रीक कारच्या तुलनेत सर्वात वेगवान कार (Fasted Electric Car ever) असेल, असा दावा ओलाने केला आहे. अवघ्या 4 सेकंदात ही कार ताशी 100चा वेग गाठेल, असं सांगितलं जातंय. अत्यंत आकर्षक आणि यूनिक डिझाईनने परिपूर्ण असलेल्या ओला इलेक्ट्रीक कारचा पहिला लूक समोर आल्यानंतर आता या कारबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते, यात शंका नाही. एका चार्जमध्ये 500 किलोमीटर पर्यंत या कारची रेंज असेल, असा दावा केला जातोय. एक झलक स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर ओलाने दाखवल्यानंतर ग्राहकांचं कुतूहला आणखी वाढलंय. या कारचं छत पूर्णपणे काचेचं असणार आहे. ओलाचे सीईओ यांनी केलेल्या दाव्यानुसार ही कार नव्या भारताचा चेहरा बनेल. स्पोर्टी लूक, एडव्हान्स कम्प्युटर, यासोबत आकर्षक ड्रायव्हिंगचा एक्स्पिरीयन्सही मिळेल, अशी शक्यता जाणकार वर्तवत आहेत. 2024मध्ये ही कार लॉन्च होणार आहे. तोपर्यंत दणक्यात या कारचं प्रमोशन चालेल, याता शंका नाही.
Wheels of the revolution! pic.twitter.com/8zQV3ezj6o
हे सुद्धा वाचा— Bhavish Aggarwal (@bhash) August 13, 2022
आतापर्यंत समोर आलेल्या इलेक्ट्रीक कारच्या तुलनेत सर्वाधिक रेंज देणारी कार ओला बाजारात आणेल, असं सांगितलं जात होतं. आणि आता तर तेच होताना दिसतंय. एका चार्जमध्ये तब्बल 500 किमी अंतर ओलाची इलेक्ट्रीक कार कापेल, असं सांगितलं जातंय.
Picture abhi baaki hai mere dost?
See you on 15th August 2pm! pic.twitter.com/fZ66CC46mf
— Bhavish Aggarwal (@bhash) August 12, 2022
ओलाच्या अधिकृत वेबसाईटवर ओला इलेक्ट्रीक स्कूटरबाबत सविस्तर माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ओला इलेक्ट्रीक कारच्या बाबतीतही सविस्तर माहिती लवकरच जारी केली जाण्याची शक्यता आहेत. त्यामुळे अनेकांच्या नजरा या कारकडे लागल्यात.
We’re going to build the sportiest car ever built in India! ??? pic.twitter.com/IyMKgQvTOi
— Bhavish Aggarwal (@bhash) July 16, 2022
टाटा नेक्सन ईव्ही, एमजी जेडीएस ईव्ही, ह्युंदाई कोना इलेक्टीर, यांसारख्या गाड्यांसोबत ओला इलेक्ट्रीकचा बाजारात सामना होणार आहे. या स्पर्धेत ओला इलेक्ट्रीक नेमकी कसं परफॉर्म करते, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.