मुंबई : ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी एक नवीन फीचर आणत आहे. याअंतर्गत युजर्स आपली स्कूटर अवघ्या 5 मिनिटांत चार्ज करू शकतील. यासाठी कंपनीने इस्रायली कंपनीशी हातमिळवणी केली आहे. ओला इलेक्ट्रिकने सोमवारी सांगितले की, त्यांनी इस्रायलची सेल तंत्रज्ञान कंपनी स्टोअरडॉटमध्ये गुंतवणूक केली आहे. अत्यंत जलद चार्जिंग सोल्यूशन्ससह बॅटरी तयार करण्यात ही कंपनी अग्रणी आहे. ओला ने भारतात आपले दोन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केले आहेत, ज्यामध्ये ओला एस 1 (Ola S1) आणि ओला एस 1 प्रो (Ola S1 Pro) यांचा समावेश आहे. या गाड्यांना भारतीय बाजारात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ओला इलेक्ट्रिकने एका निवेदनात म्हटले आहे की, स्टोअरडॉटमधील गुंतवणूक ही कंपनीने नियोजित केलेल्या अनेक जागतिक धोरणात्मक गुंतवणुकीपैकी पहिली गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीचा उपयोग प्रगत सेल केमिकल सायन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग, तसेच इतर बॅटरी तंत्रज्ञान आणि नवीन ऊर्जा प्रणालींमध्ये त्याच्या मूळ R&D चा विस्तार करण्यासाठी केला जाईल.
या गुंतवणुकीच्या मदतीने, ओला इलेक्ट्रिकला कंपनीच्या विशेष तंत्रज्ञान XFC बॅटरी तंत्रज्ञानामध्ये प्रवेश मिळेल, हे तंत्रज्ञान केवळ 5 मिनिटांत 0-100 टक्के बॅटरी चार्ज करण्यास सक्षम असेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्टोअरडॉटला भारतात फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान एकत्रित करणार्या बॅटरीच्या निर्मितीचे विशेष अधिकार असतील.
ओला इलेक्ट्रिक ही कंपनी भारतातील टॉप पाच इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांपैकी एक आहे. ओला इलेक्ट्रिकला त्यांच्या S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाल्यापासून खूप मागणी आहे. फेब्रुवारीमध्ये ओला इलेक्ट्रिकने नोंदणीत मोठी झेप घेतली आहे. गेल्या महिन्यात कंपनी 3,904 युनिट्स वितरित केल्या आहेत.
ओला इलेक्ट्रिक एस 1 स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ई-स्कूटर सुमारे 120 किलोमीटरच्या रेंजसह येते. एस 1 प्रो, त्यांची टॉप-स्पेक ई-स्कूटर आहे, जी एका चार्जवर सुमारे 180 किलोमीटर रेंजसह येते असा दावा कंपनीने केला आहे.
एस 1 मॉडेलसाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आउटपुट 2.98 kWh असेल, तर थोडी महाग असलेल्या एस 1 प्रो मॉडेलमध्ये 3.97 kWh बॅटरी देण्यात आली आहे. S1 Pro ची टॉप स्पीड 115 kmph इतकी आहे, ज्यामध्ये हायपर समाविष्ट आहे. S1 आणि S1 Pro दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल LED लायटिंग पॅकेज आणि नेव्हिगेशनसह 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात. हा डिस्प्ले 3GB रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि 4G कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे.
इतर बातम्या
अवघ्या 30 हजारात घरी न्या Bajaj Discover 150, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
5.5 लाखांची Hyundai कार 2.5 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
अवघ्या 38 हजारात खरेदी करा Honda Activa, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील