मुंबई – ओला इलेक्ट्रिक स्कुटरनं अल्पावधीतच बाजारात आपले घट्ट पाय रोवले आहेत. गाड्यांच्या विक्रीवरून याचा अंदाज येतो. ओला इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये सध्या खूप सारे फीचर्स आहेत. काही फीचर्स तर इतर स्कुटरमध्ये पाहायला देखील मिळत नाहीत. आता आणखी एक फीचर कंपनी आपल्या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये अपडेट करणार आहे. ओला इलेक्ट्रिक मूव्हओएएस 4 अपडेटसह आणणार आहे. मात्र कंपनीने या अपडेटसह गाडी येणार या बाबतची माहिती दिलेली नाही.
कंपनीने यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये पार्टी मोड आणलं होतं. यात म्युझिकच्या हिशेबाने लाईट बंद चालू होते. कंपनीचे सीईओ भाविष अग्रवाला यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात म्युझिकनुसार लाईट पेटतात तसेच एकत्र अनेक स्कुटर म्युझिकवर थिकरत असल्याचं दिसत आहे.
म्युझिकवर थिकरणाऱ्या गाड्या पाहून असं वाटतं की कॉन्सर्टमध्ये आल्याचा भास होतो. कंपनीने याला कॉन्सर्ट मोड असं नाव दिलं आहे. भाविष अग्रवाला यांनी लिहिलं आहे की, “पार्टी मोडनंतर आता कॉन्सर्ट मोड..लवकरच येत आहे..”
Do you all want this feature in MoveOS 4?? ???
After party mode, now Concert mode!! Coming soon.
P.S: This video is shot at the FutureFactory! pic.twitter.com/e2d1ntcxmP
— Bhavish Aggarwal (@bhash) April 4, 2023
कंपनी एडीएस सिस्टम तपासत असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. एडाप्टिव्ह क्रुझ कंट्रोल, कोलिजन एवॉइडन्स, पेडेस्ट्रियन डिटेक्शन सारखे फीचर्स यात असू शकतात. नव्या अपडेटमध्ये कंपनी नेव्हिगेशन सिस्टम देऊ शकते. नुकतीच या फीचर्सची टेस्ट करण्यात आली होती. कंपनी असे फीचर्स देऊन दुचाकी सेक्टरमध्ये नवी क्रांती घडवण्याच्या तयारीत आहे.
ओला इलेक्ट्रिकने आपल्या लोकप्रिय ओला एस 1 प्रोच्या किमतीत 5 हजार रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही ऑफर फक्त 16 एप्रिलपर्यंत लागू असणार आहे. कपातीनंतर ओला एस 1 प्रो इलेक्ट्रिक स्कुटर फक्त 1,24,999 रुपयांना मिळेल.
ओला एस 1 प्रोमध्ये 8.5 किलोवॅट इलेक्ट्रिक मोटर आणि 4 किलोवॅटचा बॅटरी पॅक दिला आहे. ही गाडी 181 किमी पर्यंत रेंज देते तसेच 116 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. ओला एस 1 चं टॉप व्हेरियंट आहे.