नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर 2023 : सध्या इलेक्ट्रिक स्कूटरचे प्रचलन वाढले आहे. पेट्रोल मॉडेल घेण्यापूर्वी सुद्धा ग्राहक एकदा इलेक्ट्रिक बाजारात चक्कर मारतोच मारतो. इलेक्ट्रिक स्कूटरचा पर्याय तो शोधतोच. अनेकदा चांगल्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची इच्छा असते. पण किंमत पाहिल्यावर अनेक जणांचा मूड बदलतो. पण ओला इलेक्ट्रिकने यावर एक उपाय शोधला आहे. ओला इलेक्ट्रिकच्या एस1 सीरीज अंतर्गत एकूण 4 स्कूटर मिळतात. त्यातील ओला एस1 एअर ही मध्यम बजेट स्कूटर आहे. तिची जोरदार विक्री सुरु आहे. ओला कंपनीने आता एस1एक्स नावाने स्वस्त स्कूटर पण बाजारात आणली आहे. पण किंमतीच्या दृष्टीने ओला एस1 एअरवर सर्वच फिदा आहेत. ओलाची स्कूटर (Ola S1 Air Electric Scooter Finance) आता तुम्हाला 20 हजार रुपये डाऊनपेमेंट करुन घरी घेऊन जाता येईल.
ओला एस1 एअरची किंमत
ओला एस1 एअरची किंमत आणि फीचर्स काय आहेत, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरुम किंमत 1.20 लाख रुपये आहे आणि ऑन रोड किंमत 1,24,412 रुपये आहे. ही ओला 6 रंगात येते. या स्कूटरमध्ये 3 Kwh बॅटरी आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार ही स्कूटर 101 किलोमीटरची रेंज देते. बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी चार तास लागतात. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये
डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, स्पीकर, मल्टीपल ड्राईव्ह मोड, 34 लिटर का स्पेस, फास्ट चार्जिंग, एलईडी लाइट्स, 90 kmph ची स्पीडसह अनेक फीचर येतात.
किती मिळेल कर्ज, किती दिवसांचा हप्ता
आता तुम्हाला ओला एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटर फायनान्सवर म्हणजे कर्जावर उपलबध होत आहे. तुम्हाला एक रक्कमी किंमत अदा करायची नसेल तर एक ऑफर आहे. 20 हजार रुपये डाऊनपेमेंट भरुन ही स्कूटर तुम्हाला फायनान्सवर खरेदी करता येईल. ओला इलेक्ट्रिकच्या वेबसाईटनुसार अनेक बँका ही स्कूटर खरेदी करण्यासाठी जवळपास 7 टक्के दराने कर्ज पुरवठा करत आहेत. 20 हजार रुपये डाऊनपेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक लाख 5 हजार रुपयांचे कर्ज मिळेल. तीन वर्षांसाठी कर्ज घेत असाल तर त्यासाठी 3225 रुपयांचा हप्ता येईल. पुढील 36 महिने तुम्हाला ईएमआयचा हप्ता भरावा लागेल. या कर्जासाठी तुम्हाला 11,700 रुपये व्याजापोटी द्यावे लागतील.