Ola कंपनी स्कूटरसह इलेक्ट्रिक कार लाँच करणार, कमी बजेटमध्ये जबरदस्त रेंज आणि फीचर्स

| Updated on: May 01, 2021 | 10:25 PM

कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत.

Ola कंपनी स्कूटरसह इलेक्ट्रिक कार लाँच करणार, कमी बजेटमध्ये जबरदस्त रेंज आणि फीचर्स
Ola Electric Car
Follow us on

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (Ola to manufacture electric cars)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, देशातील आघाडीची कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी असलेल्या ओलाने (Ola) अलीकडेच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची घोषणा केली आहे, ज्यावर कंपनीने कामही सुरू केले आहे. पण आता अशी बातमी समोर आली आहे की, ओला कंपनी इलेक्ट्रिक कारदेखील लाँच करण्याची तयारी करत आहे आणि लवकरच ही कार लाँच केली जाऊ शकते.

रिपोर्टनुसार ओला कंपनीने नव्या इलेक्ट्रिक कारवर काम सुरू केले आहे. अद्याप अधिकृतपणे कंपनीकडून या कारबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ऑटोकारच्या (Autocar) अहवालानुसार ही कार बॉर्न-इलेक्ट्रिक स्टेकबोर्ड प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. ही कार फ्यूचरिस्टिक डिझाइनसह प्रगत वैशिष्ट्यांसह (अॅडव्हान्स फीचर्स) सुसज्ज असेल.

बंगळुरुत ग्लोबल डिझाईन सेंटर सुरु करणार

या कारसाठी ओला कंपनी बंगळुरूमध्ये ग्लोबल डिझाईन सेंटर सुरू करण्याचा विचार करीत आहे, या ठिकाणी कार डिझाइन करण्याबरोबरच रंग, मटेरियल आणि फिनिशिंगवरही काम केले जाईल. मिळालेल्या वृत्तानुसार, ही एक कॉम्पॅक्ट कार असेल आणि सरासरी ड्रायव्हिंग रेंजसह येईल. दुसरीकडे जर या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास कंपनी या कारची किंमत कमी ठेवू शकते, जेणेकरून ती कार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. कंपनीने यापूर्वीच इलेक्ट्रिक पॅसेंजर वाहन प्रकल्पासाठी टाटा मोटर्सचे काही डिझाइनर्स नियुक्त केले आहेत.

हायपर चार्जिंग नेटवर्क उभारणार

ओलाने अलीकडेच सर्वात मोठे हायपर चार्जिंग नेटवर्क स्थापित करण्याची घोषणा केली आहे, जे कंपनीच्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरसाठी वापरलं जाईल. अशी अपेक्षा आहे की कंपनी आपली कार चार्ज करण्यासाठी देखील ही सुविधा वापरू शकेल. याशिवाय कार चार्ज करण्यासाठी घरगुती चार्जिंग डिव्हाइसदेखील दिले जाऊ शकते.

दरवर्षी 20 लाख स्कूटर्स बनवणार

तथापि, कंपनीकडून या कारबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. कंपनी इलेक्ट्रिक टू-व्हीलर विभागाच्या कारखान्याच्या निर्मितीसाठी 2,400 कोटी रुपये गुंतवणूक करत आहे. यासाठी ओला तामिळनाडूमध्ये एक प्लांट उभा करत आहे. या प्लांटचे बांधकाम सुरू झाले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या प्लांटमध्ये दरवर्षी 20 लाख स्कूटर्स तयार केल्या जातील.

संबंधित बातम्या

250cc गाड्यांना टक्कर देणारी इलेक्ट्रिक बाईक बाजारात, फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीतही बेस्ट

प्रदूषण टाळण्यासाठी ‘हा’ देश केवळ इलेक्ट्रिक वाहनं विकणार, जाणून घ्या संपूर्ण योजना

(Ola to manufacture electric cars)