क्या बात है! Olectra Greentech च्या 550 इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावणार, रेंज 325 किमी
MEIL ची उपकंपनी असलेल्या Olectra Greentech ला दक्षिण भारतातील तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (TSRTC) कडून 550 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली आहे.
1 / 5
ऑलेक्ट्राला मिळालेल्या ऑर्डरमध्ये 50 इंटरसिटी कोच ई-बस आणि 500 इंट्रासिटी ई-बसचा समावेश आहे. तेलंगणातील हैदराबाद आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा दरम्यान इंटरसिटी कोच ई-बस धावतील. ही दक्षिण भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर आहे. (Photo: Olectra Greentech Limited)
2 / 5
ई-बस पूर्णपणे वातानुकूलित असून एकदा चार्ज केल्यानंतर 325 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापू शकतात. एसआरटीसीने या ई-बससाठी दोन्ही शहरांमध्ये पाच डेपो दिले आहेत. (Photo: Olectra Greentech Limited)
3 / 5
ऑलेक्ट्रा कंपनीच्या म्हणण्यानुसार, TSRTC सोबत त्यांचा प्रवास मार्च 2019 मध्ये 40 ई-बससह सुरू केला होता. या ई-बस विमानतळापासून हैदराबादच्या विविध भागात चालवल्या जात आहेत. आता पुन्हा एकदा 550 बसची ऑर्डर दिली आहे. (Photo: Olectra Greentech Limited)
4 / 5
केव्ही प्रदीप (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक), यांनी सांगितलं की, “आम्हाला TSRTC कडून 50 इंटरसिटी कोच ई-बस आणि 500 इंट्रासिटी ई-बस पुरवण्याची ऑर्डर मिळाली आहे. आम्हाला याचा अभिमान आहे. वाहतुकीसाठी TSRTC सह भागीदारी केली आहे. ई-बस लवकरच वितरित केल्या जातील." (Photo: Olectra Greentech Limited)
5 / 5
TSRTC चे अध्यक्ष बाजीरेड्डी गोवर्धन म्हणाले, 'पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. TSRTC पुढील दोन वर्षांत राज्यभरात 3,400 इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे. (Photo: Olectra Greentech Limited)