मुंबई : भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची (electric car) मागणी वाढत आहे. लोक स्वस्त आणि महाग इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक मोटरसायकल बिनदिक्कतपणे खरेदी करत आहेत. पण या सगळ्यामध्ये एक वाईट बातमी देखील येणार आहे. ती म्हणजे येत्या काही दिवसांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती वाढू शकतात., ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लिथियम-आयन बॅटरीची मागणी तसेच किंमती वाढत आहेत. अशा स्थितीत या वर्ष किंवा पुढील वर्षापर्यंत भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती (Prices) वाढू शकतात, असे मानले जात आहे. टाटा मोटर्स (tata motors), ह्युंदाई, एमजी मोटर इंडियासह मध्यम श्रेणीतील आणि प्रीमियम इलेक्ट्रिक कार कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती वाढीबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. गेल्या वर्षी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीही पेट्रोल आणि डिझेलच्या व्हेरिएंटप्रमाणेच होतील, असे सांगितले असले तरी, हे कधी होईल याबद्दल काहीही सांगता येत नाही.
यूके-आधारित डेटा विश्लेषण आणि सल्लागार फर्म ग्लोबल डेटाने मागील वर्षीच्या थीमॅटिक रिसर्च: इलेक्ट्रिक वाहन बॅटरीज (2021) अहवालात म्हटलं आहे की आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांचा विभाग विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठा असेल. लिथियम-आयन बॅटरीच्या किमती वाढवू नयेत हे आव्हान आहे. असेही सांगण्यात आले आहे की सन 2024 पर्यंत लिथियम-आयन बॅटरीच्या किंमती 40 टक्क्यांनी वाढू शकतात, त्यामुळे आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती नक्कीच वाढणार आहेत. दरम्यान, Tata Nexon EV, Tata Tigor EV, MG ZS EV, Hyundai Kona तसेच Audi, BMW या इतर कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार्सची भारतात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
वर्ष किंवा पुढील वर्षापर्यंत भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती वाढू शकतात, असे मानले जात आहे. टाटा मोटर्स, ह्युंदाई, एमजी मोटर इंडियासह मध्यम श्रेणीतील आणि प्रीमियम इलेक्ट्रिक कार कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती वाढीबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. गेल्या वर्षी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीही पेट्रोल आणि डिझेलच्या व्हेरिएंटप्रमाणेच होतील, असे सांगितले असले तरी, हे कधी होईल याबद्दल काहीही सांगता येत नाही.