मुंबई | 20 जानेवारी 2024 : रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत भगवान रामाची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेले अरुण गोविल आजही लोकांच्या हृदयावर राज्य करतात. रामायणातील श्रीरामाची भूमिका त्यांनी ज्या पद्धतीने साकारली आहे, त्यामुळे लोक त्यांना रामाची प्रतिमा मानतात. पण अरुण गोविल यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत असेल. ते कोणत्या गाडीतून प्रवास करतात, हे तुम्हाला माहीत आहे का? रील लाइफमध्ये रामाची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याकडे असलेल्या च्या कारची किंमत ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
रामायण मालिकेत पुष्पक विमान, रथ आणि घोड्यांवर स्वार होऊन प्रवास करणाऱ्या अरुण गोविल यांच्याकडे खऱ्या आयुष्यात मर्सिडीज बेंझ CLA 200 आहे. या प्रीमियम कारची वैशिष्ट्ये आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया.
रामायणातील रामाची सवारी : मर्सिडिज बेंझ CLA 200
रामायणात प्रभू रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी 2022 साली मर्सिडीज बेंझ खरेदी केली. त्याचा फोटो आणि व्हिडीओही त्यांनी शेअर केला होता. त्यामध्ये ते आणि त्यांची पत्नी या दोघांनी त्या गाडीवरून पडदा हटवत नवी कार सर्वांना दाखवली.
प्रभु कृपा से परिवार में नए वाहन का आगमन हुआ है। आप सब की शुभकामनाएं अपेक्षित हैं। pic.twitter.com/2JEjlZzbOA
— Arun Govil (@arungovil12) June 6, 2022
प्रीमियम कारची फीचर्स
या प्रीमियम कारमध्ये तुम्हाला अनेक स्मार्ट फीचर्स मिळतील. यात 1.3-लिटर, 4-सिलेंडर टर्बोचार्ज्ड इंजिन, 163bhp पॉवर आणि 250Nm टॉर्क, 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, LED हेडलॅम्प आणि टेललाइट, 8-इंच अलॉय व्हील्स, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, cluster2-inch digital infotainment system. ,एम्बिएंट लायटिंग मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजी यांचा समावेश आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
अरुण गोविल यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये अरुण गोविल हे मर्सिडीज बेंझमधून खाली उतरताना दिसत आहेत. या कारचा लूक आणि त्यातील फिचर्स यामुळे कार आणखी खास बनते.
मर्सिडीज बेंझची किंमत
मर्सिडीज बेंझच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या कारची किंमत 42.80 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 2.55 कोटी रुपयांपर्यंत आहे. कारमध्ये आढळणारी सुरक्षा आणि स्मार्ट वैशिष्ट्ये यामुळे ही कार आणखीनच आरामदायी बनते.