नवी दिल्ली : देशातील दिग्गज उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांनी त्यांच्या सर्वात आवडत्या कारचा वाढदिवस साजरा केला. या कारचा 25 वर्धापन दिन (Anniversary) त्यांनी साजरा केला. त्यांनी याविषयीचे फोटोही त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केली. टाटा मोटर्सची मालकी आणि जॅग्वार-लँडरोवर सारख्या आलिशान कार तयार करणाऱ्या टाटांची आवडती कार पाहुन तुम्हाला ही सूखद धक्का बसेल. कारण कधी काळी या कारचे भारतीयांवर गारुड होते. ही कार शहरी आणि ग्रामीण संस्कृतीत अगदी फिट बसली होती. शहरी आणि ग्रामीण रस्त्यावर ही कार सूसाट पळत होती.
उद्योगपती रतन टाटा यांनी देशातील पहिल्या स्वदेशी कार इंडिकाचा (Indica) वाढदिवस साजरा केला. ही कार बाजारात आली, त्यावेळी ती ग्राहकांच्या पसंतीस उतरली. या कारने शहरीभागासोबतच ग्रामीण भागातही जोरदार विक्री केली. पॅसेंजर कार सेगमेंटमध्ये या कारने धुमाकूळ घातला.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत, इंडिकासोबत तरुण रतन टाटा यांचा फोटो बघता येईल. या फोटोचे रतन टाटा यांनी कॅप्शन दिले आहे. “ 25 वर्षांपूर्वी टाटा इंडिका लॉन्च करून भारतातील स्वदेशी प्रवासी कार उद्योगाची सुरुवात झाली. या आठवणी माझ्या मनात घर करुन आहेत.”
या भावनिक संदेशावर सोशल मीडियावर युझर्सच्या उड्या पडल्या आहेत. या पोस्टला 2 दिवसात 4 दशलक्षाहून अधिक लाईक्स आणि 20,000 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. या कॉमेंट्समध्ये अनेकांनी टाटा इंडिकासोबतचा त्यांचा अनुभव शेअर केले. भावना व्यक्त केल्या.
टाटा मोटर्सने पहिल्यांदा 1998 मध्ये इंडिका भारतीय बाजारात सादर केली होती. त्यावेळी या कारला भारतीयांनी विशेष प्रेम दिले. सुरुवातीच्या दोनच वर्षात ही कार यशस्वी ठरली. केवळ व्यावसायिक वाहनं तयार करणाऱ्या टाटा मोटर्सने पहिल्यांदा प्रवासी वाहन तयार केलं होतं. त्यांना कार विक्रीचा मोठा फायदा झाला.
भारतीय बाजारात टाटा मोटर्सच्या कारला लोकांची पसंती मिळू लागली. 20 वर्षानंतर 2018 मध्ये टाटा मोटर्सने टाटा इंडिका ही हॅचबॅक कार बंद केली. तिचे उत्पादन थांबवले. त्याची जागा फिचर्स आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त मॉडेलने घेतले. आजही अनेकांकडे ही कार दिसते.
टाटाने ही कार भारतीय ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केली होती. सुरुवातीला या भारतीय कारला लोकांची मोठी पसंती मिळाली नाही. पण नंतर इंधनाचा कमी वापर, पॉवरफुल इंजिन आणि चांगले डिझाईन यामुळे भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात ही सर्वाधिक विक्री करणारी कार ठरली.
ही कार भारतीय जनतेत मोठी लोकप्रिय ठरली. 20 वर्षांत ही कार सर्वाधिक विक्री झाली. जवळपास 14 लाखांहून अधिक युनिटची विक्री झाली. याचा अर्थ 14 लाखांहून अधिक भारतीयांच्या कुटुंबाची ती सदस्य झाली.