मुंबई : राॅयल एन्फील्ड (Royal Enfield) भारतीय बाजारपेठेत आणखी एक नवीन बाईक आणणार आहे, ज्याचे नाव शाॅटगन (Shotgun 650) असेल. ही बाईक कंपनीचे चौथे मॉडेल असेल, जी 650cc इंजिन सेगमेंटमध्ये येईल. सध्या, कंपनीकडे या सेगमेंटमध्ये इंटरसेप्टर 650, कॉन्टिनेंटल जीटी 650 आणि सुपर मेटिअर 650 आहेत. नवीन रॉयल एनफिल्ड बाईकचे टेस्टिंग मॉडेल नुकतेच पाहण्यात आले आहे. कंपनी याला रेट्रो स्टाईलने सादर करणार आहे. त्यात टीअर ड्रॉपच्या आकाराची इंधन टाकी दिली जाऊ शकते. याशिवाय, मोटरसायकल स्प्लिट सीट, रुंद हँडलबार, राउंड एलईडी हेडलॅम्प, ड्युअल पुशशूटर एक्झॉस्ट आणि राउंड एलईडी टेललॅम्पसह येईल.
या नवीन बाईकमध्ये सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आढळू शकते. याला आकर्षक लूक देण्यासाठी अलॉय व्हील्सचा वापर करण्यात येणार आहे. त्याच वेळी, एकदा लॉन्च झाल्यानंतर, कंपनी त्याचे सहायक भाग देखील बनवेल. सुरक्षेसाठी, या बाइकला दोन्ही चाकांसाठी डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनल एबीएस मिळेल.
Shotgun 650 मध्ये 648cc पॅरलल ट्विन इंजिन दिले जाऊ शकते. हेच इंजिन Super Meteor 650 मध्ये देखील आहे. हा सेटअप 47 अश्वशक्ती आणि 52Nm पीक टॉर्क तयार करू शकतो. त्याचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडले जाऊ शकते.
या बाईकमध्ये सस्पेन्शन हँडलिंगसाठी, समोरच्या बाजूला इनव्हर्टेड फॉर्क्स आणि मागच्या बाजूला अॅडजस्टेबल ट्विन शॉक अॅब्जॉर्बर्स दिले जाऊ शकतात.
सध्या रॉयल एनफिल्डच्या या बाईकच्या किमतींची माहिती मिळालेली नाही. हे 3.50 लाख रुपयांच्या बजेटमध्ये लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांत कंपनी ते लॉन्च करेल असा विश्वास आहे. कंपनीच्या लाइनअपमध्ये, ते कॉन्टिनेंटल जीटीच्या खाली आणि सुपर मेटिअरच्या वर ठेवले जाईल.