मुंबई : भारतात पहिल्या वहिल्या फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा पाहण्यासाठी दिग्गजांनी हजेरी लावली होती. 2.8 किमी 18 वळणं असलेल्या ट्रॅकवर या स्पर्धेचा थरार रंगला. या स्पर्धेसाठी एकूण 11 संघ आणि 22 ड्रायव्हर्संनी सहभाग नोंदवला होता. फॉर्म्युला ई आणि फॉर्म्युला 1 रेसिंगमधील फरक म्हणजे कार..या स्पर्धेत उतरलेल्या कार इलेक्ट्रिक होत्या. पोर्शे, जग्वार, निसान आणि महिंद्रा या कंपन्यांच्या गाड्या यात सहभागी झाल्या होत्या. मात्र क्रिकेटचा देव आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ड्राईव्हने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. इतकंच काय महिंद्राच्या गाडीतून फेरफटका मारल्यानंतर मोठं वक्तव्य केलं. त्याचं हे वक्तव्य ऐकून आनंद महिंद्रा यांनीही आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. तसेच त्यांना एखादी संधी मिळाली की सोडत नाही. आता खुद्द क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर असल्याने त्यांनी त्याला उत्तर दिलं आहे.
सचिन तेंडुलकरने ट्वीट करत लिहिलं आहे की,”पिनिनफॅरिना बटिस्टा हे एक उत्तम उदाहरण आहे.ही इव्ही भविष्य आहे. ही वेगवान होती, आम्ही वेळेला आव्हान देऊन भविष्यात उतरण्यासारखं आहे!खरंच आनंद महिंद्रा आणि त्यांच्या टीमने चांगली कामगिरी केली आहे. भारतीय कंपन्या जागतिक दर्जाच्या गाड्या बनवतात पाहून आनंद होतो.” मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ट्वीटला आनंद महिंद्रा यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.
The Pininfarina Battista had the perfect answer for “Are EVs the future?”.
It was so fast, we defied time and landed in the future!
A wonderful achievement by @anandmahindra & his team. Heartening to see Indian companies back cutting-edge, world class automobiles. pic.twitter.com/QWY1gmnigd
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 11, 2023
आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करून उत्तर दिलं की, “तू तर आमच्या बट्टिस्टाला चांगली टॅगलाईन दिली आहे. वेळेला आव्हान देत भविष्यात उतरलो! छान..मास्टर ब्लास्टर गाडीत असताना असंच काहीसं सुचतं. तुला आमच्या गाडीत बसलेलं पाहून आनंद वाटला.” फॉर्म्युला ई स्पर्धा पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांच्यासह इतर भारतीय क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवला होता. त्याचबरोबर दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील दिग्गज नागार्जुन, राम चरण आणि दुलारे सलमान यांनीही हजेरी लावली होती.
You just gave us a brilliant tagline for the #Battista Sachin. A car that ‘defies time & lands you in the future!’ Wah! That makes it a Master Blaster on wheels. And what a pleasure to have you with us today. @sachin_rt https://t.co/ZthdujQUg3
— anand mahindra (@anandmahindra) February 11, 2023
महिंद्रा कंपनीने गेल्या वर्षी बट्टिस्टा गाडीचं लाँचिंग केलं होतं. हायपरकार बट्टिस्टाची किंमत 18 कोटी रुपये इतकी आहे.या गाडीमध्ये चार वेगवेगळे इलेक्ट्रिक मोटर दिले आहेत.या मोटर चारही चाकांना ऊर्जा देतात. इलेक्ट्रिक मोटर संयुक्तिकपणे 1900 एचपी पॉवर आणि 2300 एनएम टॉर्क जनरेट करतात. ही गाडी 1.86 सेंकदात 0 ते 100 चा वेग धरते. 12 सेंकदात ही गाडी 0 ते 300 चा वेग धरण्यास सक्षम आहे. या गाडीचा टॉप स्पीड 350 किमी प्रतितास आहे.