मुंबई : नव्या कारच्या तुलनेत वापरलेली जुनी कार खरेदी करणे अतिशय फायदेशीर मानले जाते. बऱ्याचदा आपण नवीन कार घेण्याचा विचार करतो. मात्र, आपल्याला आवडलेली गाडी ही नेमकी आपल्या बजेटमध्ये मावत नाही. तर, काही जण नव्याने वाहन चालवायला शिकण्यासाठी गाडी शोधात असतात. अशावेळी आपल्या बजेटमध्ये मावेल आणि आपल्या गरजा देखील पूर्ण करेल अशी सेकंद हँड गाडी शोधली जाते. असा वेळी सगळ्यांच्या लिस्टमध्ये प्रथम क्रमांकावर असते ती लोकप्रिय ‘अल्टो कार’ (second hand best option for Alto 800 on true value).
जुनी कार घेण्यास स्वस्त असते आणि ग्राहकाचे बरेच पैसे देखील वाचतात. नव्या गाडीसाठी मात्र भरघोस किंमत मोजावी लागते. मात्र, जुनी गाडी खरेदी करताना ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. यातील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गाडी नेमकी कुठून खरेदी करावी? आपण मोजत असलेल्या किमतीत आपल्याला चांगली गाडी मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते.
ग्राहकांच्या याच गरजा लक्षात घेऊन मारुति सुझुकी ही प्रसिद्ध वाहन कंपनी वापरलेल्या आणि जुन्या गाड्यांची खरेदी विक्री करते. यासाठी मारुति सुझुकी या कंपनीने ‘True Value’ नावाचे स्टोर आणि वेबसाईट सुरु केली आहे. या स्टोरच्या वेबसाईटवर जुन्या गाड्या आणि त्यांची सविस्तर माहिती दिलेली असते. जर, तुम्ही मारुति सुझुकीची अल्टो कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इथे तुम्हाला 2 लाखांत चांगले पर्याय दिले जातील (second hand best option for Alto 800 on true value).
मारुति सुझुकी कंपनी 2013चे ALTO 800 LXI हे मॉडेल सध्या विकत आहे. पेट्रोल आणि सीएनजीचा पर्याय उपलब्ध असलेली ही कार 1,81,000 इतक्या किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही गाडी ‘सेकंद ओनर’ अर्थात आता तिसऱ्या मालकाकडे हस्तांतरित होणार आहे. ही कार दिल्ली स्थित असून, 75,750 किलोमीटर चालली आहे.
मारुति सुझुकी कंपनीचे 2012चे ALTO 800 LXI हे मॉडेलही सध्या या वेबसाईटवर विक्रीस उपलब्ध आहे. पेट्रोल आणि सीएनजीचा पर्याय उपलब्ध असलेली ही कार 1,90,000 इतक्या किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही गाडी ‘फर्स्ट ओनर’ अर्थात आता दुसऱ्या मालकाकडे हस्तांतरित होणार आहे. ही कार दिल्ली स्थित असून, 1,57,722 किलोमीटर चालली आहे.
(टीप : सदर माहिती मारुति सुझुकीच्या ‘True Value’ या वेबसाईटवर उपलब्ध असून, अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्यावी.)
(second hand best option for Alto 800 on true value)
Ola सोबत जोडा तुमची बाईक आणि कमवा पैसे, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया https://t.co/lsEtgH9jyB #Olaservice #bikelife
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2021