मुंबई : अनेकदा गाडीचे (Car) टायर (Tyre) कधी बदलावे हेच कळत नाही. अनेक लोक लांबच्या प्रवासाला जायचं असल्यास कारचे टायर आधी गॅरेजमध्ये (garage) दाखवून घेतात आणि त्यानंतरच प्रवासाला जातात. अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही की, गाडीचे टायर नेमके बदलायचे कधी. पावसाळ्यापूर्वी देखील गाडीचे टायर बदलण्याची अनेक ठिकाणी चर्चा असते. पावसाळ्यात गाडीच्या टायरकडे विशेष लक्ष दिलं जातं. यातच काही अशा खास गोष्टी आहेत. ज्या गोष्टींमुळे तुमच्या गाडीचे टायरही योग्यवेळी बदलले जातील आणि तुम्हीची सुरक्षित रहाल. बदलते हवामान, ड्रायव्हिंग पॅटर्न, रस्त्याची स्थिती यासारख्या गोष्टींचा तुमच्या टायर्सच्या टिकाऊपणावर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे योग्य वेळी टायर बदलणे तुमच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्वाचं आहे. कारच्या काळजीसह टायरची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाच आहे. आम्ही तुम्हाला काही इंडिकेटर सांगणार आहोत. ते जाणून घेतल्यास गाडीचे टायर योग्यवेळी बदलले जाईल आणि तुम्ही देखील सुरक्षित रहाल.
तुमच्या कारचे टायर ट्रेड वेअर इंडिकेटरसह येतात. हे टायरची ट्रेड डेप्थ दाखवतात. तुम्ही ट्रेड वेअर इंडिकेटरसह तपासू शकतात. जर टायर ट्रेडची स्थिती खूप वाईट असेल किंवा योग्य मानकांची पूर्तता करत नसेल, तर तुम्ही टायर बदलून घ्यावा.
कधीकधी, चुकीच्या अलाइनमेंटमुळे किंवा खराब सस्पेंशनमुळे टायरची स्थिती बिघडते. यामुळे टायरचे एक टोक बरोबर दिसत असले तरी दुसरे टोक खराब होते. असं झाल्यास अलाइनमेंट दुरुस्त करणं तसंच टायर बदलणं आवश्यक आहे.
टायरच्या रबरच्या कडकपणामुळे किंवा ट्रेडवर क्रॅकच्या खुणा असल्यामुळे टारमध्ये घट देखील होते. गाडी कमी चालवल्यामुळे अनेकदा असं घडतं. या प्रकाराच्या टायरमुळे तुम्ही कमी वेगानं प्रवास करू शकतात. पण जर हायवेवर गाडी चालवायची असल्यास किंवा तुम्हाला वेगावं गाडी चालवायची आवड असल्यास टायर बदलणं गरजेच आहे.
रोडियल टायर बहुतेक वाहनांमध्ये वापले जातात. या प्रकारच्या टायरमध्ये साइडवॉल व्यवस्थित ठेवणं फार महत्वाचं आहे. मात्र, खराब रस्त्याची स्थिती आणि खड्डे टारच्या साइडवॉलला नुकसान पोहोचवून शकतात. तुम्हाला साइडवॉल पॅच देतात. पण चांगल्या सुरक्षिततेसाठी टायर बदलता येऊ शकतो.
प्रत्येक गोष्टीचे वय असतं असं म्हणतात. शिवाय प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहेच. तशाच प्रकारे टायरला देखील आहे. जसजसा वेळ जातो तसतसा टायर जड होतो. त्यामुळे टायरची लवचिकता आणि पकड प्रभावित होते. टायरचं आयुष्य तीन वर्ष किंवा 40 हजार किमीपर्यंत असते. सहा महिन्यांपेक्षा जुने टायर खेरदी करू नका.