Pulsar : बाईकप्रेमींसाठी खुशखबर! लवकरच लाँच होणार N150 Pulsar

| Updated on: Sep 26, 2023 | 10:18 AM

Pulsar : बाईकप्रेमींसाठी धमाकेदार बातमी आहे. त्यांची प्रतिक्षा आता फळाला आली आहे. लवकरच बजाजची मोस्ट अवेटेड पल्सर N150 लवकरच लाँच होणार आहे. इलेक्ट्रिक बाईक आणण्याच्या तयारीत असणाऱ्या बजाज समूहाच्या या बाईककडे ग्राहकांचे लक्ष लागलेले आहे. या बाईकविषयी बाजारात जोरदार चर्चा आहे, कसा आहे तिचा नवा लूक...

Pulsar : बाईकप्रेमींसाठी खुशखबर! लवकरच लाँच होणार N150 Pulsar
Follow us on

नवी दिल्ली | 26 सप्टेंबर 2023 : खास रायडर्ससाठी बाजारात नव्या दमाची, नव्या ढंगाची, नव्या रंगाची बजाज Pulsar N150 लवकरच येत आहे. तुम्ही म्हणाल या बाईकची एवढी उत्सुकता का आहे? या बाईकची का चर्चा आहे. कारणही तसेच आहे. गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ Pulsar 150 आणि Pulsar 180 यांनी बाजार गाजवला आहे. खेड्यापाड्यात पण या बाईकची क्रेझ आहे. या दोन्ही बाईकनी अनेक बदल अनुभवले आहेत. लूक, स्टायलिश, दमदार, कमी पेट्रोल पिणारी अशा अनेक विशेषणात या बाईक न्हाऊन निघाल्या आहेत. पल्सरने रायडर्स आणि वाऱ्याशी गप्पा मारणाऱ्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला. या बाईकचे इंजिन सातत्याने दमदार कामगिरी बजावत आहे. आता नवीन बाईकचा पहिला लूक समोर आल्यापासून चाहत्यांचे या नवीन बाईकविषयीचे कुतूहल जागे झाले आहे.

Pulsar N160

Bajaj Pulsar N160 हे पण बजाजचे नवीन दमदार मॉडेल आहे. ही बाईकपण ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे. या बाईकने 2022 मध्ये ऑटोकार बाईक ऑफ द इयर 2022 सह इतर काही किताब नावावर केले आहे. N मालिकेतील हे यश साजरे करण्यासाठी Bajaj या मालिकेत 150cc बाईक उतरण्याची तयारी करत आहे. Bajaj Pulsar N150 ही लवकरच बाजारात येईल. Pulsar N150

हे सुद्धा वाचा

ऑटोकारनुसार, बजाजची नवीन Pulsar N150 लवकरच बाजारात उतरेल. Pulsar N160 च्या तुलनेत नवीन Pulsar N150 जास्त आकर्षक, आक्रमक लूक देण्यात आला आहे. स्पोर्टी प्रोजेक्टर हेडलॅम्प, मोठी टँक एक्सटेंशन आणि N160 चा टेल लूक ग्राहकांना आकर्षित करेल.

ही आहेत वैशिष्ट्ये

नवीन Pulsar N150 मध्ये सिंगल-पीस सीट आहे. तर सिंगल-डिस्क Pulsar P150 पेक्षा अधिक सुविधाजनक ग्रॅब हँडल असू शकते. या मॉडेलचे दोन व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे. यामध्ये ड्युअल डिस्क व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे. याशिवाय दोन्ही व्हेरिएंट सिंगल-चॅनल एबीएससह येऊ शकतात. बाइकचे पॉवरट्रेन N150 मध्ये P150 सारखेच असतील. या बाईकमध्ये 149.68cc इंजिन मिळण्याची शक्यता आहे. तो 5-स्पीड गियरबॉक्सशी जोडलेले असेल. याचे इंस्ट्रूमेंट कंसोल सेमी-डिजिटल यूनिट असेल.

मग किंमत तरी किती!


Bajaj Pulsar P150 सध्या 1.17 लाख रुपये (एक्स-शोरूम), तर Pulsar N160 1.3 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते. नवीन Bajaj Pulsar N150 किंमत या दोन मॉडलच्या दरम्यान असेल. तर P150 पेक्षा 5,000-7,000 रुपयांपेक्षा अधिक असेल.