13.61 लाखांत लाँच झाली सुझुकीची Katana स्पोर्ट्‌स बाईक… एकाहून एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर

| Updated on: Jul 05, 2022 | 1:14 PM

सुझुकी (Suzuki) इंडियाने आपली हेवी बाइक Katana ला लाँच केले आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी या बाइकचे टीझर प्रसिध्द केले होते. 999 सीसी असलेल्या Katana बाईकला इन लाइन फोर इंजिनसह लाँच करण्यात आले आहे. हे इंजिन (Engine) याआधी K5 GSX-R1000 आणि GSX-S1000 मध्ये वापरण्यात आले होते. या इंजिनमध्ये 148bhp आणि 106Nm पर्यंत टार्क जनरेट करण्याची क्षमता […]

13.61 लाखांत लाँच झाली सुझुकीची Katana स्पोर्ट्‌स बाईक... एकाहून एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर
Follow us on

सुझुकी (Suzuki) इंडियाने आपली हेवी बाइक Katana ला लाँच केले आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी या बाइकचे टीझर प्रसिध्द केले होते. 999 सीसी असलेल्या Katana बाईकला इन लाइन फोर इंजिनसह लाँच करण्यात आले आहे. हे इंजिन (Engine) याआधी K5 GSX-R1000 आणि GSX-S1000 मध्ये वापरण्यात आले होते. या इंजिनमध्ये 148bhp आणि 106Nm पर्यंत टार्क जनरेट करण्याची क्षमता आहे. Katana सुझुकीच्या इंटेलिजेंट राइड सिस्टमवर काम करत आहे. कंपनीने या ॲडव्हान्स (advanced) इलेक्ट्रानिक कंट्रोल सिस्टमसह लाँच केले असून ते ट्रॅक्शन कंट्रोल, ड्राइव्ह मोड सेलेक्टर, राइड बाइ वायर इलेक्ट्रॉनिक थोटलने सुसज्ज आहेत.

 

5 मोड सेटिंगसह झाली लाँच

 

हे सुद्धा वाचा

या बाइकमध्ये सुझुकीने ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम दिली आहे. ही सिस्टम पाच विविध मोडसह युजर्सना मिळणार आहे. नवीन ड्राइव्ह मोड सिलेक्टर तीन विविध मोड्‌सच्या माध्यमातून बाइकला एक वेगळा करेक्टरस्टिक्स देईल. 999 सीसी इंजिन असलेली ही बाइक Euro-5 कॉम्पलिएंटससह उपलब्ध होणार आहे. याआधी इंजिनला नवीन कँमशाफ्ट प्रोफाईलसह अपडेट करण्यात आले होते. नवीन वाल्व स्प्रिंग, नवीन क्लच आणि नवीन Exhuast सिस्टमसह युजर्सना उपलब्ध होणार आहे.

 

कोणकोणत्या फीचर्सचा समावेश?

 

सुझुकी Katana मध्ये ग्राहकांना एलसीडी डिसप्ले, एलईडी हेडलाइट, टेल लाइट आणि टर्न सिग्नल तसेच टर्न सिग्नल, सुझुकी इंटेलिजेंट राइडर सिस्टम मिळणार आहे. ब्लॅक आणि ग्रे ड्युअल टोन कलन सीटदेखील युजर्सना मिळणार आहे. यात तीन विविध थोटल मॅप्स एक्टिव, बेसिक आणि कंफर्ट असणार आहेत. या बाइकची सरळ स्पर्धा कावासाकी निंजा 1000एसएक्स, बीएमडब्ल्यू एफ900 सोबत होणार आहे.