नवी दिल्ली | 9 March 2024 : टाटा मोटर्स आता नव्या जोमाने आणि दमाने बाजारात उतरणार आहे. प्रवाशांसाठी आणि व्यावसायिक वाहनांसाठी आता दोन कंपन्या अस्तित्वात येणार आहे. टाटा मोटर्स या मार्च महिन्यात टाटा पंच ईव्ही सोडून इतर सर्व इलेक्ट्रिक कारवर आकर्षक सूट आणि इतर फायदे देत आहे. ही ऑफर खास करुन 2023 मध्ये उत्पादित कारांवर देत आहे. स्टॉक संपविण्यासाठी टाटा मोटर्सने खास ऑफर आणली आहे. यामध्ये नेक्सन ईव्ही, टियागो ईव्हीच्या नवीन 2024 मधील मॉडेलचा समावेश आहे.
दोन सेगमेंटमध्ये विभागणी
टाटा मोटर्सच्या बोर्डाने केलेल्या घोषणेनुसार, आता व्यवसायाचे दोन भाग होतील. यामध्ये एक भाग व्यावसायिक वाहनांसाठी असेल. त्यात बस, ट्रक, छोटा हाथी यांच्यासह इतर वाहनांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. तर दुसरे सेगमेंट पॅसेंजर व्हेईकलवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. यामध्ये पेट्रोल-डिझेल कार, इलेक्ट्रिक कार आणि कंपनीचे भविष्यातील प्रकल्पाचा समावेश आहे. त्याचा शेअरधारकांना फायदा होईल.
टाटा नेक्सन ईव्हीवर मोठी सवलत
टाटा टियागो ईव्हीवर सवलत
टियागो ईव्हीच्या MY2023 कारवर 65,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळतो. यामध्ये 50,000 रुपयांचा ग्रीन बोनस आणि 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळते. तर नवीन 2024 मॉडलवर 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे.
टाटा टिगोर ईवीवर सूट
टाटा टिगोरवर एकूण 1.05 लाख रुपयांपर्यंतची सवलत देण्यात येत आहे. यामध्ये 75,000 रुपयांची रोख सवलत, तर विविध व्हेरिएंटवर 30,000 रुपयांचे एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. अर्थात ही सवलत MY2023 मॉडलवरच उपलब्ध आहे. टिगोर ईवी मध्ये 26kWh बॅटरीपॅकसह 315 किमीची ARAI प्रमाणित रेंजचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये इलेक्ट्रिक मोटर 75hp आणि 170Nm चे आऊटपुट जेनरेट होते.