मुंबई : देशातील प्रमुख वाहन निर्मात कंपनी टाटा मोटर्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कंपनीने याबाबतची माहिती देत आनंद व्यक्त केला आहे. एकीकडे टाटा समुहाचे संस्थापक जमसशेदजी टाटा यांचा 183 वा जन्मदिवस आणि दुसरीकडे कंपनी 25 लाख प्रवासी वाहनं तयार करण्याचा विक्रम नोंदवला आहे. कंपनीची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत कंपनीने 50 लाख गाड्यांची निर्मिती केली आहे. हा आनंद कंपनीने अनोख्या पद्धतीने साजरा केला. टाटा मोटर्सने 1977 साली पहिलं कमर्शिअल वाहन रोलआउट केलं होतं. त्यानंतर पॅसेंजर व्हेइकल असलेली टाटा इंडिया 1998 साली बाजारात लाँच केली. यानंतर कंपनीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
टाटा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हा आनंद वेगळ्या पद्धतीने साजरा केला. गाड्यांच्या मदतीने ’50 लाख’ असं लिहीलं आणि कामगिरीची झलक दाखवली. टाटा मोटर्सने इतकी उंची गाठल्यानंतर कंपनीचे अधिकारी शैलेश चंद्रा यांनी सांगितलं की, “आज मोटर्सच्या इतिहासात हा आनंदाचा क्षण आहे कारण आम्ही आजपर्यंत 50 गाड्यांची निर्मिती केली आहे. हा आमच्या कामगिरीतील एक मैलाचा दगड आहे.”
A huge milestone for @TataMotors . 50 lakh cars and counting. EVs playing a big role in this feat. Great achievement @TataMotors_Cars @Tatamotorsev @RNTata2000 pic.twitter.com/tPf5XP4JAQ
— Deepankar Sadekar (@Dippy_S) March 3, 2023
टाटा मोटर्सनं 2004 साली 10 लाख पॅसेंजर व्हेईकल निर्मितीचा आकडा गाठला होता. त्यानंतर 2010 मध्ये 20 लाख, 2015 मध्ये 30 लाखांचा टप्पा गाठला होता. 2020 मध्ये कोरोनाची लाट असताना कंपनीने 40 लाखवी कार लाँच केली होती. त्यानंतर आता तीन वर्षात आणखी 10 गाड्यांची निर्मिती करून 50 लाखांचा टप्पा गाठला आहे.
टाटा मोटर्सने आतापर्यंत वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक मॉडेल सादर केले आहेत. यात टाटा सफारी, टाटा सूमो, टाटा इंडिगो, टाटा हॅरियर, टाटा पंच आणि टाटा नेक्सॉन या गाड्यांचा समावेश आहे. टाटा मोटर्सच्या गाड्यांची मागणी गेल्या काही दिवसात वाढतच चालली आहे. टाटाने नेक्सन, हॅरियर आणि सफारी एसयुव्हीची रेड डार्क एडिशन लाँच केली आहे. नेक्सन रेड डार्क एडिशनमध्ये पेट्रोल आणि डिझेल एडिशनमध्ये आहे.
Driving forward into a legendary inning.
Tata SAFARI #DARK – the Proud Official Partner of Tata WPL 2023.India, it's time to #ReclaimYourLife#TataMotorsPassengerVehicles #SafariXTataWPL #TataWPL pic.twitter.com/AvkmUa59oD
— Tata Motors Cars (@TataMotors_Cars) March 3, 2023
कंपनीने मागच्या महिन्यातील विक्रीत 3 टक्क्यांची वाढ केली आहे. टाटा मोटर्सने 79,705 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी हीच विक्री 77,733 युनिट्सची विक्री केली होती.