भारतातील ऑटोमोबाईल (Automobile) सेक्टरमध्ये ग्राहकांची सर्वाधिक पसंती एसयूव्ही सेगमेंटच्या कार्सना मिळताना दिसत आहे. त्यानुसार, विविध कार निर्मात्या कंपन्यादेखील आपल्या अपकमिंग गाड्या एसयुव्ही सेगमेंटमध्ये तयार करताना दिसून येत आहे. टाटा मोटर्स (Tata Motors) आणि ह्युंदाई मोटर सारख्या कार निर्मात्या कंपन्या सध्या त्यांच्या त्यांच्या मेन प्रोडक्टसह एसयुव्ही सेगमेंटकडेही प्राधान्याने लक्ष देत आहेत. त्यामुळे साहजिक स्पर्धा देखील वाढताना दिसून येत आहे. गेल्या महिन्यात विक्री झालेल्या कार्सच्या आकड्यांनुसार, भारतात विकल्या गेलेल्या टॉप-5 एसयुव्ही (SUV) मध्ये वरील दोन्ही कार निर्मात्या कंपन्यांच्या किमान दोन मॉडेल्सचा सहभाग होता. किआ इंडिया एसयुव्ही विक्रीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जून महिन्यात भारतात विकल्या गेलेल्या टॉप-5 एसयुव्हीची माहिती देणार आहोत.
टाटा नेक्सॉन ही टाटा मोटर्सची सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही असून गेल्या काही महिन्यांपासून भारतातील एसयुव्ही सेगमेंटमध्ये ही कार आघाडीवर आहे. या एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जनही अतिशय लोकप्रिय ठरले होते. कंपनीने जूनमध्ये नेक्सॉन एसयुव्हीच्या 14,295 युनिट्सची विक्री केली. गेल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात टाटाने नेक्सॉनच्या 14,614 युनिट्सची विक्री केली होती.
ह्युंदाई मोटर्सचे हे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. 2020 मध्ये ऑटो एक्स्पो दरम्यान नवीन व्हर्जन मॉडेल लाँच झाल्यापासून क्रेटाच्या विक्रीत वाढ झाली आहे. जूनमध्ये ह्युंदाईने एसयुव्हीच्या 13,790 युनिट्सची विक्री केली. जास्त मागणीमुळे जास्त वेटिंग असूनही क्रेटाची लोकप्रियता कमी झालेली नाही.
टाटा मोटर्सच्या या सर्वात लहान एसयूव्हीला ग्राहकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. टाटा पंच एसयुव्ही बाजारात दाखल झाल्यापासून सुरुवातीच्या काही महिन्यांत आपली लोकप्रियता सिद्ध केली असून पुन्हा एकदा विक्री वाढवली आहे. टाटाने गेल्या महिन्यात पंच एसयूव्हीच्या 10,414 युनिट्सची विक्री केली. दरम्यान, जर सिट्रोएनने 20 जुलै रोजी एसयुव्ही हॅचबॅक लाँच केली, तर टाटा पंचला C3 मध्ये चांगली स्पर्धा करावी लागणार आहे.
ह्युंदाई मोटर्सने ह्युंदाई वेन्यूचे नवीन जनरेशन मॉडेल लाँच केले आहे, नवीन फीचर्ससह सुसज्ज हे व्हेरिएंट विक्रीतही चांगला परफार्मेंस दाखवेल अशी कंपनीला आशा आहे. दरम्यान, जूनमधील विक्रीच्या बाबतीत जुन्या मॉडेलच्या 10,321 युनिट्सची विक्री केली.
टॉप-5 एसयुव्ही विक्रीच्या यादीतील पाचवी एसयुव्ही किआ सेल्टोस आहे. ही किआची फ्लॅगशिप कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे. किआने गेल्या महिन्यात सेल्टोसच्या 8,388 युनिट्सची विक्री केली. तर गेल्या वर्षी याच महिन्यात 8,549 कार्सची विक्री झाली होती.