नवी दिल्ली : टाटाची नवीन सफारी लॉन्च झाली आहे. कंपनीने या आलिशान कारची डिलीव्हरीसुद्धा सुरू केली आहे. टाटा मोटर्स आपल्या ग्राहकांसाठी सफारीसोबत एक्सेसरी पॅकेजही देत आहे. एक्सेसरीमध्ये आपल्याला फोर इन ऑल ऑप्शन मिळणार आहे. याच्या किंमतीबाबत मात्र कंपनीकडून अजून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. बेस एक्सेसरीज पॅकेजची किंमत 40 हजार रुपये आहे. चार पॅकेजची नावे Accomplished, Accomplished Pro, Adventure आणि Adventure Pro अशी आहेत. (tata Motors launches new Safari, know about the unique features of the car)
तुमची आवडती एक्सेसरीज घेऊ शकता
जर आपल्याला काही आरामदायी एक्सेसरीज हव्या असतील, तर आपण Accomplished आणि Pro व्हर्जनची निवड करू शकता. तसेच जर आपल्याला चारपैकी कुठलेही पॅकेज नको असेल तर आपण टाटा मोटर्सच्या शोरुममध्ये जाऊन तुम्हाला आवडणारी एक्सेसरीज लावू शकता. Accomplished पॅकेजमध्ये आपल्याला डमी एग्जॉस्ट क्रोम, मडफ्लॅप्स, टेलगेट क्रोम, रियर बंपर क्रोम, बोनट मास्कॉट, स्कफ प्लेट्स, पडल लॅम्प्स, एयर प्युरीफायर, कार्पेट्स, फ्लोर मॅट मिळणार आहे. तसेच प्रो व्हर्जनमध्ये अंडरबॉडी लायटिंग, वायरलेस चार्जर, फ्रंट पार्किंग सेंसर्स, साइट स्टेप्स आणि रियर सीट एंटरटेनमेंट मिळू शकणार आहे.
काय आहेत अॅडव्हेंचर पॅकेज?
अॅडव्हेंचर पॅकेजबाबत बोलायचे झाल्यास यात बोनेट स्कूप, फ्रंट पार्किंग सेंसर्स, साइड स्टेप्स, डॅशकॅम, बॅकसीट ऑर्गनायजर, 3डी मोल्डेड मॅट्स आणि स्क्प प्लेट्स यांचा समावेश असेल. टाटा मोटर्स नव्या सफारीमध्ये सायकल कॅरिअर, लगेज बॅग्स, जेरी कॅन्स, व्हील कॅप्स आणि रूफ रॅकसुद्धा देणार आहे. हे रॅक 75 किलोपर्यंतचे वजन उचलू शकणार आहे.
परफॉर्मंन्स अपग्रेड नाही
या पॅकेजशिवाय ग्राहक अन्य एक्सेसरीज घेऊ शकणार आहेत. हे सर्वकाही ala carte च्या मदतीने होऊ शकेल. टाटा सफारीमध्ये कुठलेही परफॉर्मंन्स अपग्रेड नाही. सफारीमध्ये 2.0 लीटरचे डिझेल इंजन देण्यात आले आहे. हे इंजिन 170एचपी/ 350एनएमला टॉर्क देते. नवीन सफारी गाडी 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ऑप्शनसह येते.
टाटा मोटर्सने सफारीच्या किंमती खूप आक्रमक ठेवल्या आहेत. टाटा सफारीचा बेस व्हेरिएंट हॅरियरपेक्षा नवीन गाडीची 69,500 रुपये अधिक आहे. टाटा सफारी आणि टाटा हॅरियरच्या एक्सझेड व्हर्जनच्या तुलनेत किंमतीत 1.34 लाख रुपयांचा फरक आहे. मात्र, सफारी आणि हॅरियरचे टार्गेट ग्राहक वेगवेगळे आहेत. दुसरीकडे, जर आपल्याला 1.34 लाख रुपये देऊन अधिक जागा आणि अधिक वैशिष्ट्ये मिळत असेल तर सफारी खरेदी करण्यात काहीच हरकत नाही. (tata Motors launches new Safari, know about the unique features of the car)
Oily Skin | तेलकट त्वचेच्या समस्येने हैराण? मग ‘या’ गोष्टी खाणे टाळा!#OilySkin | #Food | #skincare | #skincaretips https://t.co/4ZMii99Y8t
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2021
इतर बातम्या