4 कोटींसारखी कार केवळ 10 लाखांत! Tata आणणार नवीन दमदार Car

| Updated on: Feb 18, 2024 | 11:48 AM

Tata Curvv | टाटा मोटर्स आता एक भन्नाट प्रयोग करणार आहे. इलेक्ट्रिक वाहन बाजारात टाटाने मांड ठोकली आहे. आता टाटा विविध प्रयोग करुन इतर कंपन्यांचे ग्राहक आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यातच आलिशान कारसारखे फीचर्स आणि लूक असणाऱ्या कार बाजारात उतरविण्यात येणार आहे.

4 कोटींसारखी कार केवळ 10 लाखांत! Tata आणणार नवीन दमदार Car
Follow us on

नवी दिल्ली | 18 February 2024 : टाटा मोटर्स भारतातील सर्वात यशस्वी आणि मोठी कार उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी नवनवीनच नाही तर अभिनव प्रयोग करत आहे. अनेक कारच्या मॉडेल्सवर सध्या काम सुरु आहे. टाटा फ्युचरिस्टिक कार डिझाईनवर भर देत आहे. 4 कोटी रुपयांच्या Lamborghini Urus सारखे फीचर, फील देण्याचा प्रयत्न टाटा त्यांच्या नवीन कारमध्ये देणार आहे. या कारची किंमत पण दहा लाखांच्या जवळपास असेल. या कारचे नाव Tata Curvv असे आहे. पण ती बाजारात कधी येणार हे समोर आलेले नाही.

ऑटो एक्सपोत दर्शन

ऑटो एक्सपो 2023 मध्ये Tata Curvv चे दर्शन झाले होते. या कार्यक्रमात कंपनीने पहिल्यांदा ही कार उतरवली होती. ही कार केवळ इलेक्ट्रिक व्हर्जनमध्येच नाही तर फ्युएल आधारीत इंजिनासह उतरविण्यात येणार आहे. तुम्हाला वाटत असेल चार कोटींच्या कारसारखे यामध्ये असे काय खास असेल तर ते पण जाणून घेऊयात..

हे सुद्धा वाचा

10 लाखांच्या कारचे 4 कोटींच्या कारसारखे डिझाईन

टाटा कर्व्हचे डिझाईन हे लॅम्बोर्गिनी उरुसशी मिळते जुळते असेल. पण या नवीन कारची किंमत चार कोटी नसेल तर 10-11 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची दाट शक्यता आहे. लॅम्बोर्गिनी उरुसची किंमत 4.18 कोटी रुपये आहे. पण या दोन्ही कारचे डिझाईन अगदी सारखे वाटते.

Lamborghini Urus आणि Tata Curvv मध्ये अंतर

लॅम्बोर्गिनी उरूस ही एक दमदार आलिशान कार आहे. तर टाटा कर्व्ह ही एक कॉन्सेप्ट कार आहे. ही कार अजून बाजारात उतरविण्यात आलेली नाही. कंपनी ही कार या वर्षी बाजारात उतरविण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या कारमध्ये फीचर्स रेलचेल असण्याची शक्यता आहे. पण लूक, डिझाईन हे अगदी चार कोटींच्या लॅम्बोर्गिनी उरूससारखे असणार आहे.

बाजारात कोणाशी Tata Curvv ची टक्कर

Tata Curvv ही एक एसयुव्ही आहे. भारतात सध्या एसयुव्ही सेगमेंटमध्ये तीव्र स्पर्धा आहे. अनेक फीचर्ससह सुविधांसह एकाहून एक सरस कार भारतीय बाजारात येत आहेत. Tata Curvv चा सामना हुंदाई क्रेटा, किआ सेल्टॉस, होंडा एलिवेट, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, टोयोटा हायरायडर सारख्या कारसोबत होईल.