Tata Nexon EV : ही कार ठरणार गेम चेंजर! विचारही केला नसेल असे दमदार फीचर्स

| Updated on: Sep 10, 2023 | 3:44 PM

Tata Nexon EV : इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात सध्या अनेक नवीन फीचरच्या कार बाजी मारत आहेत. नवनवीन कल्पनांसह या कारने धुमाकूळ घातला आहे. त्यात आता टाटा नेक्सॉन या इलेक्ट्रिक कारची भर पडली आहे. या कारने असे फीचर आणले आहेत की कार प्रेमींच्या या कारला पाहण्यासाठी उड्या पडल्याशिवाय राहणार नाही.

Tata Nexon EV : ही कार ठरणार गेम चेंजर! विचारही केला नसेल असे दमदार फीचर्स
Follow us on

नवी दिल्ली | 10 सप्टेंबर 2023 : टाटा मोटर्स (Tata Motors) सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत दमदार फीचर्संमुळे टाटाच्या कारची सध्या बाजारात चर्चा सुरु आहे. कधीकाळी टाटा केवळ व्यावसायिक आणि जडवाहनांचे उत्पादन करत होते. या ब्रँडने नाव कमावल्यानंतर सर्वसामान्यांनी कार बनविण्याची मागणी केली. त्यानुसार, कंपनी सुद्धा बाजारात उतरली. तिने अनेक प्रयोग केले. काही कारने विक्रीत रेकॉर्ड केला. सर्वात स्वस्त आणि मिनी कार देण्याचा एक प्रयोग पण नॅनोच्या रुपाने या कंपनीने केला. प्रयोगशील वृत्तीमुळे टाटाने स्वतःला अपडेट केले. आता ईलेक्ट्रिक व्हेईकलच्या बाजारात पण टाटाने उडी घेतली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि क्रांतीकारी मॉडेलसह टाटा बाजारात तिची नवीन ओळख निर्माण करत आहे. टाटा नेक्सॉनचे हे इलेक्ट्रिक मॉडेल (Tata Nexon Electric Vehicle) त्यामुळेच चर्चेत आले आहे.

असे आहेत फीचर्स

टॉप स्पेक नेक्सॉन फेसलिफ्ट सह इतर अनेक फीचर आहेत. यामध्ये 360 डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, वायरलेस चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर आदी फीचर्स आहेत. स्टँडर्ड 6 एअरबँग, ईएससी, प्रत्येक सीटला तीन पॉईंट सीट बेल्ट, आयएसओफिक्स, इमरजेंसी आणि ब्रेकडाऊन कॉल असिस्टेंटची सुविधा देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Arcade.ev.App

कंपनीने Arcade.ev.App लाँच केले आहे. या एसयुव्हीमध्ये नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राईम व्हिडीओ हे ओटीटी प्लॅटफॉर्म पाहू शकता. कंपनीने यामध्ये JBL साऊंड सिस्टम, व्हाईस कमांड, सिंगल पॅन सनरुफ, फास्ट चार्जिंग, सी-पोर्ट ही सुविधा दिली आहे.

बॅटरी बॅकअप किती

दूरच्या प्रवासासाठी कंपनीने या कारमध्ये 40.5 किलोवॅटची बॅटरी पॅक देण्यात आले आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार 465 किलोमीटर धावते. मागील दोन व्हेरिएंटपेक्षा या मॉडेलमध्ये 12 किलोमीटरची वाढ दिसून आली आहे. इतरही अनेक भन्नाट फीचर या कारमध्ये आहे. या बॅटरी चार्ज होण्यासाठी 4:30-6 तासांचा कालावधी लागतो.

कारवरुन कार करा चार्ज

टाटा मोटर्सच्या Nexon Electric च्या नवीन मॉडेलमध्ये काही हटके फीचर्स आले आहेत. त्यानुसार, कंपनीने व्हेईकल टू व्हेईकल तंत्रज्ञान आधारे कार चार्जिंगची सुविधा दिली आहे. एका इलेक्ट्रिक कारवरुन दुसरी इलेक्ट्रिक कार चार्ज करता येईल. लांब अंतर कापण्यासाठी त्याचा उपयोग पण होऊ शकतो.

कारच्या मदतीने चालवा उपकरणं

Nexon EV मध्ये कंपनीने आणखी एक फीचर जोडले आहे. यामध्ये कंपनीने व्हेईकल टू लोड सिस्टमचा समावेश केला आहे. त्यामुळे कारच्या बॅटरीआधारे तुम्ही इतर उपकरणे चार्ज करता येईल. त्याआधारे टीव्ही बघता येईल, प्रोजेक्टर लावता येईल. ड्रोनसाठी त्याचा वापर करता येईल. सध्याच्या मॉडलची किंमत 14.49 ते 19.54 लाखादरम्यान आहे. पण या दमदार फीचर्स येणाऱ्या कारची किंमत अजून जाहीर करण्यात आली नाही.