राजकोट : गेल्या वर्षभरात देशात इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicles) मागणी वाढली आहे. त्याहून जास्त त्यांना लोकप्रियता लाभली आहे. परंतु आपल्या घराजवळ चार्जिंग स्टेशन नसल्याने अनेक जण इच्छा असूनही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत नाहीत. आपल्या देशात चांगलं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नसल्यामुळे लोक इलेक्ट्रिक कार विकत घेत नाहीत, तर जे लोक इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करतात ते आपलं वाहन चार्ज करण्यासाठी वेगवेगळ्या शकला लढवत आहेत. गुजरातमधील टाटा नेक्सनच्या (Tata Nexon Electric Car) एका मालकानेही आपल्या कारवर असाच एक प्रयोग केला आहे. या कारमालकाने त्याच्या कारवर पवनचक्की (Rooftop Mounted Windmill) बसवली आहे. (Tata Nexon owner tries to charge his vehicle with Rooftop Mounted Windmill, Check Video)
Cartorq च्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ गुजरातमधील राजकोट येथील आहे. टाटा नेक्सन ईव्हीच्या मालकाने आपल्या वाहनाच्या छतावर पवनचक्की बसवली आहे. या पवनचक्कीच्या सहाय्याने कार मालक आपली कार चार्ज करण्याचा प्रयत्न करीत आहे. तथापि, हा सेटअप पूर्णपणे विचित्र वाटत होता, तसेच यामुळे कार खूपच वाईट दिसते.
या प्रयोगामुळे या कारचं डिझाईन देखील खराब झालं आहे, कारण एका पवनचक्कीच्या सहाय्याने आपण टाटा नेक्सनची बॅटरी चार्ज करू शकत नाही. पवनचक्क्या खूप जड असतात आणि इन्स्टॉल करण्यासाठी स्टील प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते. पूर्ण सेटअपमुळे, वाहनाचे वजन मोठ्या प्रमाणात वाढू शकते. अशा परिस्थितीत वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात उर्जा खर्च होते. त्यामुळे कारचे मायलेज/रेंजदेखील प्रभावित होऊ शकते.
पवनचक्कीचं इन्स्टॉलेशन करणं ही एक निरुपयोगी कल्पना आहे, कारण पवनचक्कीमुळे जास्त पॉवर निर्माण होत नाही, हे सर्वांनाच ठाऊक आहे. कारण जर आपल्याला वीज तयार करायची असेल तर पवनचक्की वेगाने फिरली पाहिजे. परंतु या कारवरील पवनचक्की काही प्रमाणात धिम्या गतीने फिरत होती. त्यामुळे तुम्हीदेखील तुमच्या इलेक्ट्रिक कारवर असा एखादा प्रयोग करण्याची योजना आखत असाल, तर ही एक चुकीची कल्पना आहे हे लक्षात घ्या, तसेच असं करणं धोकादायक सिद्ध होऊ शकतं. त्यामुळे असा कोणताही प्रयोग करु नका, ज्यामुळे तुमची लाखो रुपयांची कार खराब होईल.
संबंधित बातम्या
Citroen ची छोटी इलेक्ट्रिक कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
इंधन दरवाढीवर जालीम उपाय, एकदा चार्ज करा आणि सुस्साट फिरा, 130KM रेंजसह ई. स्कूटर बाजारात
(Tata Nexon owner tries to charge his vehicle with Rooftop Mounted Windmill, Check Video)