Tata Nexon Panoramic Sunroof Price : टाटा नेक्सॉन भारताची सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. आता या 5 स्टार रेटींग SUV कारला दोन सनरुफचे पर्याय आले आहेत. नेक्सॉनला सिंगल पॅन सनरुफसह सादर केले होते. परंतू टाटा मोटर्सने सीएनजी व्हर्जनमध्ये पॅनॉरमिक सनरुफमध्ये तिला सादर करीत एसयुव्हीचा अंदाज बदलला होता. आता पेट्रोल आणि डिझेल व्हर्जनमध्ये देखील पॅनॉरेमिक सनरुफची संगत मिळणार आहे. दुसरीकडे नेक्सॉन खरेदी करणाऱ्या सणासुदीची सूट देखील मिळणार आहे.
नेक्सॉनच्या सर्व व्हर्जनमध्ये दोन वेग-वेगळे सनरुफचे ऑप्शन मिळत आहेत. पेट्रोल आणि डिझेल मॉडेलच्या स्वस्तातील व्हेरीएंटसाठी व्हॉईस असिस्टेड सिंगल – पॅन सनरुफ दिला आहे. तर महागड्या टॉप-ऑफ-द-लाईन फियरलेस+ ट्रिममध्ये व्हॉईस असिस्टेड पॅनॉरमिक सनरुफ दिला आहे. टाटा नेक्सॉन CNG त पॅनॉरमिक सनरुफ सह अनेक व्हेरीएंटचा पर्याय आहे.
टाटा नेक्सॉनला सहा एअर बॅग,इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल ( ESC ) , हील होल्ड असिस्ट आणि 360-डिग्री कॅमेरा सारखे भन्नाट फिचर्स दिले आहेत. यात 10.25 इंचाचा फ्लोटिंग इंफोटेनमेंट डिस्प्ले देखील दिला आहे. एंड्रॉयड ऑटो आणि एप्पल कारप्लेसाठी वायरलेस कम्पॅटिबिलिटी देखील आहे, सेंटर कन्सोल स्मार्टफोनसाठी वायरलेस चार्जिंग पोर्ट देखील आहे.
भारत NCAP क्रैश टेस्टमध्ये नेक्सॉनला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे. या कारला सणासुदीत खरेदी केल्यास 80,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. याशिवाय टाटाच्या कारवर 45,000 रुपयापर्यंत वेगळे कस्टमर बेनिफिट्स आहेत.
सिंगल-पॅन सनरूफच्या नेक्सॉन पेट्रोल कारची एक्स-शोरूम किंमत 8.99 लाख रुपयापासून सुरु होते. डिझेलच्या नेक्सॉन सिंगल-पॅन सनरूफ एसयूव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.29 लाख रुपये आहे.
6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स सोबत पेट्रोल-पॉवर्ड नेक्सॉन पॅनोरमिक सनरूफची एक्स-शोरूम किंमत 13.59 लाख रुपयांपासून सुरु होते. डिझेल व्हर्जनची 6 स्पीड मॅन्युअलमध्ये पॅनोरमिक सनरूफची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये आहे.
पॅनोरमिक ऑप्शन सह सर्वात महागडे मॉडल नेक्सॉन डार्क एडिशन डिझेल असून त्याची एक्स-शोरूम किंमत 15.79 लाख रुपये आहे. संपूर्ण नेक्सॉन व्हर्जनमध्ये हे महागडे मॉडेल आहे.
टाटा नेक्सॉनची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून 15.79 लाख रुपयांदरम्यान आहे. ही कार 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन सह अनेक ट्रांसमिशन ऑप्शन सोबत उपलब्ध आहे. यंदा वर टाटा नेक्सॉनने CNG आवृत्तीला देखील लॉन्च केले आहे.