Tata Tiago NRG XT : टाटा टियागो एनआरजीचे एक्सटी व्हेरिएंट होणार लाँच… काय असणार किंमत?

| Updated on: Aug 01, 2022 | 11:13 AM

कंपनी टियागो एनआरजीचे एक्सटी व्हेरिएंट लवकरच लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. अपकमिंग एक्सटी व्हेरिएंटमध्ये काही लहान मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. नवीन टियागो एनआरजीचे अपकमिंग व्हेरिएंट सध्याच्या टॉप व्हेरिएंटच्या तुलनेत स्वस्त असण्याची शक्यता आहे.

Tata Tiago NRG XT : टाटा टियागो एनआरजीचे एक्सटी व्हेरिएंट होणार लाँच... काय असणार किंमत?
टाटा टियागो एनआरजीचे एक्सटी व्हेरिएंट होणार लाँच... काय असणार किंमत?
Image Credit source: twitter
Follow us on

देशातील ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रात एसयुव्ही कार्सच्या मागणीत वाढ झाली असली तरी हॅचबॅक कारलाही अद्याप मार्केट शेअर आहे. भारतात अजूनही असे अनेक लोक आहेत, जे महागड्या एसयुव्ही कार्स खरेदी करु शकत नाहीत. त्यांच्यासाठी हॅचबॅक कारच स्वप्न ठरत आहेत. देशाची प्रमुख कार निर्माता कंपनी असलेल्या टाटा मोटर्सदेखील लोकप्रिय हॅचबॅक कार (Hatchback car) टियागो एनआरजीचे नवीन व्हेरिएंट (Tata Tiago NRG XT) लाँच करणार असल्याची माहिती आहे. रिेपोर्ट्‌सनुसार कंपनी टियागो एनआरजीचे एक्सटी व्हेरिएंट लवकरच लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. अपकमिंग एक्सटी व्हेरिएंटमध्ये काही लहान मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. नवीन टियागो एनआरजीचे अपकमिंग व्हेरिएंट सध्याच्या टॉप व्हेरिएंटच्या तुलनेत स्वस्त असण्याची शक्यता आहे.

एनआरजी एक्सटी व्हेरिएंटचे फीचर्स

एनआरजीच्या एक्सटी व्हेरिएंटबाबत अद्याप जास्त माहिती समोर आलेली नाही. परंतु रिपोर्ट्‌सनुसार, अपकमिंग व्हेरिएंटमध्ये टियागो एक्सटी व्हेरिएंटसारखे फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, एनआरजी एक्सटी व्हेरिएंटमध्येही एनआरजीचे टॉप व्हेरिएंटसारखे एक्सटीरियर आणि इंटीरिअर मिळू शकतात. जास्त रफ-टफ लुकसाठी एनआरजीचा ग्राउंड क्लिअरेंस टियागोच्या तुलनेत 11 एमएम जास्त आहे. टाटा टियागो एनआरजीची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत 6.82 लाख रुपये आहे. एनआरजी एक्सटी व्हेरिएंटची किंमत यापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

एक्सटी व्हेरिएंटचे स्पेसिफिकेशन्स

अपकमिंग एनआरजी एक्सटीमध्ये देखील जास्त ग्राउंड क्लिअरेंस मिळण्याची अपेक्षा आहे. एचटी ऑटोनुसार, एनआरजी एक्सटी व्हेरिएंटमध्ये बॉडी क्लँडिंग आणि ग्राउंड क्लिअरेंसशिवाय रूफ रेल देखील मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या सारखे नवीन व्हेरिएंटमध्ये देखील 1.2 ली एनएएस तीन सिलेंडर पेट्रोल इंजिनची पावर मिळणार आहे. तर कारमध्ये 5 स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्स किंवा 5 स्पीड गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

टियागो एनआरजी

टियागो एनआरजी व्हर्जनची एडिशनल बॉडी क्लँडिंग कारला एक चांगला दमदार लूक देते. यामध्ये काही लहान बदल करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एनआरजी मॉडेल सामान्य टियागोपेक्षा 37 एमएम लांब आहे. कारच्या स्ट्रक्चरमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. टियागो एनआरजीमध्ये पुढे आणि मागे देण्यात आलेल्या क्लँडिंग कारची लांबी वाढविण्यास मदत करतात.