नवी दिल्ली | 12 डिसेंबर 2023 : अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी Tesla, भारतीय बाजारपेठेत येण्यासाठी अनेक प्रयोग करत आहे. त्यासाठीची जवळपास सर्वच तयारी झाली आहे. पण या कंपनीसाठी भारताचे दरवाजे अजून उघडले नाहीत. जर भारतीय नियमांची अंमलबजावणी पूर्ण केली तर कदाचित लवकरच ही कार भारतीय रस्त्यांवरुन धावेल. या घाडमोडींदरम्यान एलॉन मस्क यांची सोशल मीडियावरील एक पोस्ट पण चर्चेत आली आहे. भविष्यात टेस्ला कारमध्ये एक जबरदस्त फीचर आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे वाहनधारकाला कारच्या पार्किंगची झंझट उरणार नाही. त्यानुसार, कार स्वतः वाहनतळावरील मोकली जागा शोधले आणि त्याठिकाणी उभी राहील.
एक्सवर केला खुलासा
एलॉन मस्क याने सोशल नेटवर्किंग साईट X वर याविषयीचे संकेत दिले. एका युझर्सच्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने ही माहिती दिली. त्यानुसार, कंपनी या सिस्टिमवर काम करत आहे. त्यानुसार, कार स्वतः पार्किंग स्पॉट ओळखेल आणि स्वतः पार्क होईल. कार चालकाला केवळ वाहनतळावरील पार्किंग स्पॉटची निवड करावी लागेल. तो कारच्या बाहेर आल्यावर कार स्वतः त्या जागेवर उभी राहील.
ऑटो पार्कचा पर्याय
एलॉन मस्क याच्यानुसार, त्याची टेस्ला कंपनी अशा फीचरवर काम करत आहे. त्याआधारे टेस्ला पार्किंगची जागा हेरेल. अथवा तुम्ही मोकळी जागा निवडल्यानंतर ही कार त्या जागी स्वतःहून अभी राहील. या फीचरला ऑटोपार्क असे नाव देण्यात आले होते. पण नवीन फीचरमध्ये संभावित अनेक बदल असतील.
Model 3 मध्ये होते फीचर
कंपनीची लोकप्रिय इलेक्ट्रिक कार Model 3 मध्ये ऑटो पार्क फीचर देण्यात आले आहे. पण हे नवीन तंत्रज्ञान त्यापेक्षा अधिक उपयोगी आहे. यामध्ये कार स्वतः पार्किंग स्पॉट शोधणार आहे. यापूर्वीच्या ऑटो पार्क मोडमध्ये वेगवेगल्या पार्किंग लोकेशन दरम्यान निवडीची सुविधा मिळत नाही. केवळ ऑटोमॅटिक पद्धतीने कार पार्क होईल. यामध्ये अजून एक फीचरची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, अपघात झाल्यानंतर एअरबॅग उघडताच आपत्कालीन क्रमांकावर तात्काळ कॉलची सुविधा देणार आहे.