Marathi News Automobile The condition of your cars gearbox will remain cool just have to do this work
कारच्या गिअरबॉक्ससाठी ‘या’ गोष्टी ठरतात महत्वपूर्ण… प्रत्येकाला याची माहिती हवीच…
कारच्या इतर पार्टप्रमाणेच गिअरबॉक्स हा देखील एक महत्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे यामध्ये काहीही गडबड होउ नये असेच प्रत्येक कार मालकास हवे असते. परंतु कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे गिअरबॉक्सला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गिअरबॉक्स चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी या लेखातील काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
कार
Image Credit source: social media
Follow us on
मुंबई : कारचा गिअरबॉक्स (Car Gearbox) हा एक महत्वपूर्ण घटक असतो. या घटकामुळे इंजिनची (Engine) पावर चाकांपर्यंत पोहोचवण्यास मदत मिळत असते. म्हणूनच हा कारचा अतिशय महत्त्वाचा भाग मानला जात असतो. कार मालकांनी नेहमी गिअरबॉक्सच्या कंडीशनचा आढावा घेतला पाहिजे. कारची कार्यक्षमता उत्तम राखण्यासाठी गिअरबॉक्सचे योगदान बहुमुल्य असते. वेळोवेळी गिअरबॉक्सची सर्व्हिसिंग केल्यास कारची स्थिती सुधारते. परंतु आपण सर्वसामान्यपणे गिअरबॉक्सच्या कंडीशनकडे (Condition) दुर्लक्ष करीत असतो. या लेखातील काही महत्वपूर्ण गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या कारची स्थिती चांगली ठेवू शकतात.
चांगल्या मेकॅनिकची निवड करावी : कारच्या चांगल्या स्थितीसाठी चांगल्या व कुशल मेकॅनिकची निवड अतिशय महत्वपूर्ण आहे. एक चांगला मेकॅनिक तुमच्या कारची योग्य सर्व्हिसिंग करु शकतो.
वेळेवर तपासणी करावी : कारच्या गिअरबॉक्समध्ये कोणताही बिघाड होण्याची शक्यता असल्यास ताबडतोब एखाद्या चांगल्या कारागिराकडून कारची तपासणी करुन घ्यावी, आवश्यक ते पार्ट बदलून घ्यावेत. कारच्या चांगल्या कामगिरीसाठी कार कंपनीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करु नये. वेळेवर तपासणी केल्याने आवश्यक पार्ट खराब होण्याआधीच त्यांना बदलता येते.
वेळेवर सर्व्हिसिंग करा : कारची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यात सर्व्हिंसिंग अतिशय महत्वपूर्ण ठरत असते. कार कंपनीनुसार सूचनांनुसार वेळोवेळी सर्व्हिसिंग करुन घ्यावी; त्यामुळे गिअरबॉक्ससह कारचे सर्व घटक योग्यरित्या कार्य करतात.
गिअरबॉक्सवर लक्ष ठेवा : गिअरबॉक्सच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारमधील मोठे बिघाड टाळण्यासाठी वेळच्या वेळी कारची काळजी घेतल्यास मोठा भुर्दंड सोसावा लागत नाही.
कार काळजीपूर्वक चालवा : केवळ कार चालवणे आणि कार काळजीपूर्वक चालवणे यात मोठा फरक आहे. कार मालकांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, की क्लचचा वापर गरज असेल तेव्हाच करावा. क्लचचा वापर फूटरेस्ट म्हणून करू नये. कार काळजीपूर्वक चालवल्यास गिअरबॉक्सही जास्त काळ टिकतो.