नवी दिल्ली | 8 सप्टेंबर 2023 : कारचे जग हे फार मोठं आहे. आलिशान कारचे जग आहे. त्यामध्ये अनेक फिचर्स, सुविधा यांचा समावेश असतो. जितकी मोठी कार, तेवढं तुमचे बजेट मोठे इतके सोपे हे गणित आहे. त्यामुळे अनेकांना इच्छा असून ही कार घेता येत नाही. कार महागड्या झाल्या आहेत. त्यामागे अनेक कारणं आहेत. तरीही अनेकांना घरासमोर चारचाकी उभी असावी. त्यातून फिरता यावे अशी माफक अपेक्षा असते. तुम्हाला पण कार खरेदी करायची असेल आणि मोठे बजेट नसेल तरी चारचाकीचे स्वप्न साकारता येते. कमी बजेटमध्ये (Cheapest Car) चांगली कार येते. या कार मायलेजमध्ये पण चांगल्या असतात. म्हणजे कमी इंधनात या जास्त अंतर कापतात. आता या पाच कार तुमचे स्वप्न साकार करु शकतात. यामध्ये मारुती, बजाज, रेनॉल्ट क्विड या कारचा समावेश आहे. या कारसाठी फार मोठे बजेट लागत नाही.
Bajaj Qute
बजाज कंपनीची ही कार भारतात सर्वात स्वस्त किंमतीत मिळते. paybima नुसार, या कारची एक्स शो रुम किंमत 2.64 से 2.84 लाख रुपये आहे. शहरानुसार या किंमतीत तफावत दिसू शकते. ही कार तुम्ही पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन प्रकारात खरेदी करता येते. ही 4 सीटर कार आहे. ही कार मायलेज पण चांगला देते. या चारचाकीत 216.6cc, लिक्विड कूल्ड इंजिन बसविण्यात आले आहे. या कारच्या फ्युएल टँकमध्ये 35 लिटर पेट्रोल बसते.
Renault Kwid
रेनॉल्ट क्विड ही अनेकांच्या पसंतीला उतरलेली कार पण एक चांगला पर्याय आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 4,69,500 रुपये आहे. शहरानुसार या किंमतीत तफावत असू शकते. या कारची 1.0 लिटर क्षमता आहे. या कारमध्ये 22-23 किलोमीटर मायलेज मिळते. 5 सीटर कारमध्ये चांगले फिचर मिळतात.
Maruti Alto 800
मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी ही कार आहे. स्वस्तात मारुती ऑल्टो 800 हा चांगला पर्याय ठरु शकतो. या कारची एक्स शोरुम किंमत 3,54,000 रुपये आहे. शहरानुसार या किंमतीत फरक दिसून येऊ शकतो. आता पेट्रोलसोबतच सीएनजीचा पर्याय पण उपलब्ध झाला आहे. यामध्ये 796cc, 3 सिलेंडर इंजिन मिळते. या कारमध्ये 5 लिटर क्षमतेचे फ्युएल टँक आहे. ही कार कमी इंधनात मोठा पल्ला गाठते.
Datsun Redi-GO
Datsun Redi-GO A 2023 कार 3.98 लाख रुपयांपासून सुरु होते. शहरानुसार या कारच्या किंमतीत तफावत असू शकते. या कारमध्ये 799CC क्षमतेचे इंजिन आहे. ही कार 22 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देते.
Maruti S-Presso
मारुती सुझुकीची ही कार तुम्हाला वाटल्यास खरेदी करता येईल. शहरानुसार या कारच्या किंमतीत फरक दिसून येतो. या कारमध्ये 998cc,K10C टाईपचे इंजिन आहे. या कारमध्ये सेफ्टी फिचर आहेत. या कारमध्ये एडव्हान्स्ड हिल होल्ड असिस्ट, ईएसपी, ईबीडीसह एबीएस, डुअल एअरबॅग आणि इतर फीचर आहेत. ही कार सीएनजीमध्ये पण उपलब्ध आहे.