भारतात तयार होत असलेल्या काही कार्स केवळ भारतातच नव्हे तर विदेशातदेखील (Abroad) खूप लोकप्रिय
(Popular) ठरत आहेत. देशातील सर्वाधिक एक्सपोर्ट (Export) किआ सेल्टोसचे झाले आहे. ही कार एक्सपोर्टच्या बाबतीत क्रमांक एकवर आहे. या शिवाय मारुती सुझुकी आणि ह्युंडाई या कार्सदेखील चांगल्याच लोकप्रिय ठरत आहहेत. एक्सपोर्टबाबत ताजे आकडे पाहिल्यास एप्रिल 2022 मध्ये कारचे 46 हजार 538 युनिट एक्सपोर्ट करण्यात आले होते. तर हाच आकडा एप्रिल 2021 मध्ये 42 हजार 17 युनिट इतका होता. अशा प्रकारे कार एक्सपोर्टमध्ये 11 टक़्क्यांची वाढ नोंदविण्यात आली होती.
किआ मोटर्सची सर्वाधिक लोकप्रिय कार किआ सेल्टोस देशातील सर्वाधिक एक्सपोर्ट होत असलेली कार आहे. गेल्या महिन्यात याची एकूण 5 हजार 376 युनिटला एक्सपोर्ट करण्यात आले होते. एप्रिल 2021 मध्ये केवळ 2 हजार 611 युनिट एक्सपोर्ट झाल्या होत्या. कंपनीने या वेळी 2 हजार 765 युनिटची अधिक विक्री करुन 105.90 टक़्क्यांची मोठी ग्रोथ मिळवली आहे. पाच हजार युनिट् एक्सपोर्ट करण्यात येणारे हे एकमेव मॉडेल आहे.
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी देखील एक्सपोर्टच्या बाबतीत खूप पुढे आहे. कार एक्सपोर्टच्या बाबतीत मारुती सुझुकी स्विफ्टचा दुसरा क्रमांक लागतो. एप्रिल 2022 मध्ये याचे एकूण 4 हजार 165 युनिट एक्सपोर्ट करण्यात आले होते. तर मागील वर्षी एप्रिलमध्ये 1 हजार 537 युनिट एक्सपोर्ट करण्यात आले होते. या दरम्यान, कंपनीने स्विफ्ट माडलच्या 2 हजार 628 युनिट अधिक एक्सपोर्ट करुन 170.98 टक्क्यांची अधिक वाढ मिळवली आहे.
एक्सपोर्टमध्ये तिसऱ्या क्रमांक मारुती सुझुकी डिझायरचा लागतो. डिझायरने युनिटच्या एक्सपोर्टमध्ये 46.27 टक्क्यांची ग्रोथ मिळवली आहे. एप्रिल 2022 मध्ये डिझायरने एकूण 2 हजार 762 युनिट एक्सपोर्ट केले होते. तर एप्रिल 2021 मध्ये एकूण 1 हजार 40 युनिट एक्सपोर्ट करण्यात आले होते. एप्रिल 2021 आणि 2022 चे आकडे बघितले असता. मारुती सुझुकी डिझायरने 2 हजार 762 युनिट जास्त एक्सपोर्ट केले आहेत.
एप्रिल 2022 मध्ये ह्युंडाई सेंट्रोची एकूण 3 हजार 339 युनिट एक्सपोर्ट करण्यात आले होते. एप्रिल 2021 मध्ये ह्युंडाई सेंट्रोचे केवळ 1 हजार 40 युनिट एक्सपोर्ट झाले होते. परंतु कंपनीने या वेळी चांगली ग्रोथ मिळवली आहे. 2022 मध्ये 2 हजार 299 युनिट जास्तीची निर्यात केली आहे. या माध्यमातून कंपनीने 221.06 टक़्के वृध्दी मिळवली आहे.
कंपनीने मागील वर्षी एप्रिलमध्ये मारुती सुझुकी एस-प्रेसोची 2 हजार 193 युनिट एक्सपोर्ट केले होते. या तुलनेत कंपनीने या वर्षी एस-प्रेसोची 2 हजार 193 युनिट एक्सपोर्ट केले आहे. या वर्षी कंपनीने 47.15 टक़्के ग्रोथ मिळवली आहे. एप्रिल 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 1 हजार 34 युनिट जास्तीचे एक्सपोर्ट केले आहे.