खाणकामासाठी हायड्रोजन इंधनाचे ट्रक वापरण्याची या उद्योगपतीची योजना

| Updated on: Jan 18, 2023 | 4:50 PM

या हायड्रोजन ट्रकचे वजन सुमारे ५५ टन असणार आहे. त्यात तीन हायड्रोजन टँकचा वापर केला जाणार असून त्यामुळे २०० किमीचा पल्ला हे ट्रक गाठू शकणार आहेत. हे ट्रक या वर्षअखेर भारतात दाखल होणार आहेत.

खाणकामासाठी हायड्रोजन इंधनाचे ट्रक वापरण्याची या उद्योगपतीची योजना
fuel-celltruck
Image Credit source: fuel-celltruck
Follow us on

मुंबई :  महागड्या इंधनावर पर्यायी इंधनाचा उपाय सुचवला जात आहे. त्यामुळे इथेनॉल, सौरऊर्जा तसेच अन्य पर्यायी इंधनांचा विचार होत असतानाच आता ट्रान्सपोटेशनसाठी अदानी एन्टरप्राईझेशने अशोक लेलँड आणि कॅनडाच्या बेलार्ड पॉवर या कंपन्यांच्या मदतीने हायड्रोजन फ्युअल सेल इलेक्ट्रीक ट्रक विकसित करणार आहेत. त्यामुळे आशिया खंडात प्रथमच भारतात हायड्रोजन इंधानावरील ट्रकचा वापर होणार आहे.

अदानी उद्योग समुहाने ट्रकच्या तंत्रज्ञानात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अशोक लेलँड आणि कॅनडाच्या बेलार्ड पॉवर यांच्या एक करार होणार आहे. त्याद्वारे खानकामासाठी हायड्रोजन इंधनावरील ट्रक वापरले जाणार आहेत. या करारामुळे आशियातील पहीली मायनिंगसाठी हायड्रोजनवर चालणारे ट्रकची संकल्पना अस्तित्वात येणार आहे. हे ट्रक या वर्षअखेर भारतात दाखल होणार आहेत.

अब्जाधीश गौतम अदानी यांनी या करारावर सह्या केल्या आहेत. अदानी समूह या प्रकल्पावर दहा वर्षांसाठी ५० अब्ज अमेरीकन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. बेलार्ड हायड्रोजन सेलचे तंत्रज्ञान तर अशोक लेलँड ट्रकचे तंत्रज्ञान पुरविणार आहेत. या हायड्रोजन ट्रकचे वजन सुमारे ५५ टन असणार आहे. त्यात तीन हायड्रोजन टँकचा वापर केला जाणार असून त्यामुळे २०० किमीचा पल्ला हे ट्रक गाठू शकणार आहेत. यात बेलार्ड १२० केडब्ल्यू पीईएम तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाची क्षमता येत्या दशकात वार्षिक तीन दशलक्ष टन करण्याची योजना आहे.