नवी दिल्ली : वाहन विक्रीच्या बाबतीत महिंद्राने (Mahindra Sales Growth) गेल्या काही दिवसांपासून मोठी झेप घेतली आहे. ऑटो सेक्टरमध्ये या कंपनीचे स्टार चमकले आहेत. या वाहन उत्पादक कंपन्यांनी तिच्या प्रतिस्पर्ध्यांना आस्मान दाखविले आहे. महिंद्राच्या वाहन विक्रीने मोठी उसळी घेतली आहे. जानेवारी 2023 च्या सुरुवातीलाच महिंद्राने जोरदार कामगिरी बजावली आहे. नवीन वर्षे कंपनीसाठी लकी ठरले आहे. या वर्षात विक्रीच्या बाबतीत अर्थातच महिंद्रा चौथ्या क्रमांकावर आहे. पण विक्रीच्या दरवाढीच्या जोरावर तिने मारुती, हुंदई आणि टाटा कंपनीला(Maruti, Hyundai, Tata) पिछाडीवर ढकललेले आहे. मारुती, हुंदई आणि टाटा या कंपन्यांच्या विक्री वृद्धीदरांची एकूण बेरीज ही महिंद्राच्या वृद्धीदरापेक्षा कमीच आहे. महिंद्राने याबाबतीत बाजी मारली आहे.
मारुती सुझुकीने जानेवारी 2023 मध्ये एकूण 1,47,348 युनिटची विक्री केली. गेल्या वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास फरक लक्षात येईल. त्यानुसार, जानेवारी 2022 मध्ये या कंपनीने केलेल्या विक्रीपेक्षा 14.29 टक्के जादा विक्री झाली आहे. जानेवारी 2022 मध्ये कंपनीने 1,28,924 युनिटची विक्री केली होती.
तर जानेवारी 2023 मध्ये हुंदाईने 50,106 युनिटची विक्री केली होती. विक्रीच्या बाबतीत ही कंपनी दुसऱ्या स्थानावर आहे. या कंपनीची वार्षिक विक्रीत 13.82 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा कंपनीने चांगली कामगिरी बजावली आहे. हुंदाई मारुती सुझुकीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
त्यानंतर टाटा मोटर्सचा क्रमांक लागतो. टाटा कंपनीने एकूण 47,987 युनिटची विक्री केली आहे. कंपनीने वार्षिक आधारावर चांगली कामगिरी बजावली आहे. कंपनीने विक्रीत गेल्या वर्षीपेक्षा 17.68 टक्क्यांची वाढ केली आहे. कंपनी विक्रीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विक्रीच्या आधारे मारुती, हुंदाई, टाटा या कंपनीनंतर महिंद्राचा क्रमांक लागतो. पण विक्रीच्या दरवाढीच्या जोरावर महिंद्राने बाजी मारली आहे. या कंपनीने एकूण 33,040 युनिटची विक्री केली आहे. वार्षिक आधारावर 65.50 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मारुती, हुंदई आणि टाटाच्या विक्रीचा वृद्धी दर एकत्रित केला तर केवळ 45.79 टक्के एवढाच भरतो. महिंद्राचा विक्री दर 65.50 टक्के आहे. हा आकडा या तीनही कार कंपन्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या कंपनीने याबाबतीत सरस कामगिरी बजावली आहे.
Society of Indian Automobile Manufacturers यांनी आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, जानेवारी ते नोव्हेंबर 2022 याकाळात एकूण 4.13 दशलक्ष नवीन वाहनांची विक्री झाली. यामध्ये व्यावसायिक वाहनांच्या विक्रीचा आकडा समाविष्ट नाही.
जर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीचा एकूण आकडा जोडल्यास भारतातील एकूण वाहनांच्या विक्रीचा नवीन रेकॉर्ड तयार होईल. टाटा मोटर्ससह इतर उत्पादकांच्या व्यावसायीक वाहनांच्या चौथ्या तिमाहीतील आकड्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
चीनमध्ये 2021 या वर्षात 26.27 दशलक्ष वाहनांची विक्री करण्यात आली. त्यामुळे ग्लोबल ऑटो मार्केटमध्ये चीन सर्वात पुढे आहे. तर 15.4 दशलक्ष वाहनांसह अमेरिका दुसऱ्या स्थानी आहे. ऑटो सेक्टरमध्ये जागतिक स्तरावर भारताचाही बोलबाला झाला आहे.