Toyota Cars : होंडाच्या मायलेज कारशी स्पर्धा करायला येणार टोयोटाची ‘ही’कार… लाँचिंगच्या आधी जाणून घ्या 5 फीचर्स

| Updated on: Jun 29, 2022 | 7:30 PM

टोयोटाच्या  Urban Cruiser Hyryder टीझर व्हिडिओमध्ये कारच्या हेडलाइट्सबाबत स्पष्ट दिसत आहेत. या एसयुव्ही कारमध्ये स्प्लिट, हेडलँपचा सेटअप मिळणार आहे. यात एलईडी डीआरएल लाइट आणि प्रायमरी हेडलँप देखील मिळणार आहे. सोबत यात एलईडी टेल लाइट्‌सचा वापर करण्यात आला आहे.

Toyota Cars : होंडाच्या मायलेज कारशी स्पर्धा करायला येणार टोयोटाची ‘ही’कार... लाँचिंगच्या आधी जाणून घ्या 5 फीचर्स
toyota urban cruiser
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

टोयोटाच्या (Toyota) Urban Cruiser Hyryder कारला 1 जुलै रोजी लाँच करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृतरित्या कंपनीकडून देण्यात आली आहे. ही एक एसयुव्ही सेगमेंटची कार असणार आहे. या कारबाबत कंपनीने एक टीझरदेखील शेअर केले आहे. या टीझरच्या माध्यमातून ग्राहक कारमधील पाच महत्वपूर्ण फीचर्सही (Features) माहिती मिळवू शकणार आहेत. या कारची सर्वात मोठी स्पर्धक होंडा असणार आहे. होंडाची कार हायब्रिउ इंजिनसह उपलब्ध असून त्यासोबत ते ग्राहकांना एक चांगला मायलेज देण्याबाबतही पुढे आहेत. त्यामुळे होंडाच्या (Honda) या कार्सना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी टोयोटाने आपली ही कार बाजारात उतरविण्याचे धोरण आखले आहे. कंपनीकडून नेमक यात काय नवीन देण्यात आलयं याची माहिती या लेखातून घेणार आहोत.

  1. टोयोटाच्या Urban Cruiser Hyryder च्या टीझर व्हिडिओमध्ये कारच्या हेडलाइट्सबाबत स्पष्ट दिसत आहेत. या एसयुव्ही कारमध्ये स्प्लिट, हेडलँपचा सेटअप मिळणार आहे. यात एलईडी डीआरएल लाइट आणि प्रायमरी हेडलँप देखील मिळणार आहे. सोबत यात एलईडी टेल लाइट्‌सचा वापर करण्यात आला आहे.
  2. टोयोटाच्या या अपकमिंग कारमध्ये हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे. या माध्यमातून कारला सेल्फी चार्जिंगला मदत मिळणार आहे. टोयोटाच्या या कारमध्ये सेल्फ चार्जिंग हायब्रिड पावरट्रेन मिळणार आहे. दरम्यान, आतापर्यंत या कारची टेक्नीकल बाजू समोर आलेल्या नाहीत परंतु हे नक्की आहे, की ही कार 1.5 लीटर पेट्रोलसह माइल्ड हायब्रिड सिस्टम 1.5 लीटर पेट्रोल इलेक्ट्रिक हायब्रिउ पावरट्रेनमध्ये मिळणार आहे.
  3. प्रीमिअम ड्युअल टोन अलॉय व्हील्सच्या मदतीने या अपकमिंग कारला एक चांगला लूक प्राप्त होणार आहे. ही कारची डिझाईन अतिशय प्रीमिअम दिसणार आहे. हे फीचर कारला इतर कारपासून वेगळे करते.
  4. टोयोटाच्या या अपकमिंग कारमध्ये युजर्सना कॅबिनच्या आत 9 इंचाचा टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळणार असून यामुळे कारचा लुक अतिशय आकर्षक दिसणार आहे. एका रिपोर्टनुसार, ही एक स्मार्ट प्ले, कॉस्ट प्रो सिस्टीमवर काम करणारी कार आहे. सोबतच यात अँड्रोईड ऑटो आणि ॲप्पल कार प्लेचाही सपोर्ट मिळणार आहे.
  5. टोयोटा एसयुव्ही कारमध्ये कनेक्टेड कार टेक्नोलाजी दिसून येत आहे. न्यू टोयोटा ग्लँजा कारच्या तुलनेत या कारमध्ये अनेक चांगले फीचर्स देण्यात आलेले आहेत.