मुंबई : जर तुम्ही अलिकडेच मारूती कंपनीची गाडी खरेदी केली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. मारूती कंपनीने सतरा हजार कारमध्ये गडबड आढळल्याने त्यांना बाजारातून परत बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कंपनीच्या अनेक महत्वाच्या प्रसिद्ध मॉडेलचा समावेश आहे. या गाड्यांमध्ये अल्टो, ब्रेजापासून अलिकडेच लाँच झालेल्या ग्रँड विटाराचाही समावेश आहे. या कारना न चालविता तातडीने त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या कारच्या मालकांना कंपनीच्या अधिकृत शोरूममधून संदेश पाठविण्यात आला आहे.
मारूती कंपनीने आपल्या ग्राहकांना सावधान करीत आपल्या काही अलिकडेच बाजारात विकलेल्या गाड्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या चालकांनी या कार चालविणे धोक्याचे असल्याने त्यांनी त्या चालवू नयेत अशा सूचना कंपनीने दिल्या आहेत. संशयित वाहनांमधील काही महत्वाचे भाग जोपर्यंत बदलले जात नाहीत तोपर्यंत ही वाहने चालवू नयेत असे कंपनीने म्हटले आहे. वाहनांच्या मालकांना मारूती सुझुकी कंपनीच्या अधिकृत वर्कशॉपमधून संदेश जाऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्या गाड्यांना परत बोलावले आहे.
मारूती सुझुकी कंपनीने बुधवारी एक पत्रक जारी केले आहे. त्यात काही गाड्यांच्या खराब एअरबॅग नियंत्रकांना बदल्यास सांगितले आहे. त्यात अल्टो के 10, ब्रेजा, बलेनो या मॉडेलच्या 17,362 गाड्यांना त्यासाठी परत बोलविले आहे. देशाच्या सर्वात मोठ्या कार निर्मात्याने म्हटले आहे की 8 डिसेंबर 2022 आणि 12 जानेवारी 2023 दरम्यान निर्माण झालेल्या अल्टो के 10, एस-प्रेसो, ईको, ब्रेझा, बलेनो, आणि ग्रँड विटारा या कारना परत बोलविण्यात आलो आहे.
काय झाला आहे बिघाड
या कारमध्ये आवश्यकता वाटल्यास एअरबॅग नियंत्रकाची मोफत तपासणी केली जाईल. यात काही तरी दोष असल्याचा संशय आहे. त्यामुळे अपघाताप्रसंगी एअरबॅग आणि सिटबेल्टच्या कार्यावर परीणाम होऊ शकतो.