इंडियन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात एका नवीन इलेक्ट्रिक स्कूटरने जबरदस्त एंट्री घेतली आहे. दिग्गज दुचाकी कंपनी टीव्हीएस मोटरने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले आहे. TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरचे सर्वात नवीन आणि बेस व्हेरिएंट आहे. यामध्ये 2.2kWh ची बॅटरी आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरुम किंमत 94,999 रुपयांपासून सुरु होते. बजेटच्या हिशोबाने ही इलेक्ट्रिक स्कूटर अनेक खास फीचर्स आणि रेंजसह मिळते.
कमी कालावधीत चार्ज
टीव्हीएसची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर केवळ 2 तासात 0 ते 80 टक्के चार्ज होते. याशिवाय नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वाधिक गती ताशी 75 किमी आहे. यामध्ये 5 इंचाची कलर TFT स्क्रीन देण्यात आली आहे. याशिवाय या व्हेईकल क्रॅश, टो अलर्ट, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 30 लिटर स्टोरेज देण्यात आले आहे.
TVS चे सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर
TVS आयक्यूब 2.2kWh मॉडल दोन रंगात उपलब्ध आहे. यामध्ये वालनट ब्राऊन आणि पर्ल व्हाईट हे दोन रंग उपलब्ध आहेत. हे कंपनीचे सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. एकदा फुल चार्ज झाल्यावर हे इलेक्ट्रिक स्कूटर 75 किलोमीटरचे अंतर कापते. नवीन व्हेरिएंट शिवाय TVS iQube ST ची डिलिव्हरीची पण घोषणा करण्यात आली आहे. आता हे मॉडल दोन व्हेरिएंट- 3.4kWh आणि 5.1kWh मध्ये येते. याची किंमत क्रमशः 1.55 लाख रुपये आणि 1.83 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
TVS iQube ST : बॅटरी आणि रेंज
टीव्हीएस आईक्यूब एसटी 3.4kWh व्हेरिएंटची रिअल वर्ल्ड रेंज 100 किलोमीटर आहे. याचा अर्थ एकदा फुल चार्ज झाल्यावर ही स्कूटर 100 किलोमीटरचा पल्ला गाठते. सर्वात शक्तीशाली मॉडल 5.1kWh बॅटरीसह येते. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 150 किलोमीटर धावेल. तर 5.1kWh मॉडल 4 तास आणि 18 मिनिटात 0 ते 80 टक्के चार्ज होते.
TVS iQube ST : फीचर्स
टीव्हीएस आयक्यूब एसटीमध्ये अनेक फीचर्स आहेत. यामध्ये 7 इंचाची कलर TFT टचस्क्रीन डिस्प्ले, TPMS, कनेक्टेड फीचर्स आणि 32 लिटरचा बूट स्पेस मिळते. 5.1kWh व्हेरिएंटचा टॉप स्पीड ताशी 82 किलोमीटर आहे. तर 3.4kWh व्हेरिएंट ताशी 78 किलोमीटर धावते. हे इलेक्ट्रिक स्कूटर कॉपर ब्राँझ मेटे, कोरल सँड सेटिन, टाइटेनियम ग्रे मेटे आणि स्टारलाइट ब्लू या पर्यायात उपलब्ध आहे.